VIDEO : नितीन गडकरींच्या घराबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांवर फेकली स्कूटर

VIDEO : नितीन गडकरींच्या घराबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांवर फेकली स्कूटर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतल्या घराबाहेर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली. याच वेळी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने स्कूटर उचलून पोलिसांच्या दिशेने फेकली.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 सप्टेंबर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतल्या घराबाहेर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली. याच वेळी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने स्कूटर उचलून पोलिसांच्या दिशेने फेकली.दिल्लीमध्ये सुधारित मोटरवाहन कायद्याच्या अमलबजावणीला सुरुवात झाली आहे पण यामुळे जबर दंड बसतोय. त्यामुळे लोकही याला विरोध करत आहेत.या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी नितीन गडकरींच्या घराबाहेर निदर्शनं केली.त्यांनी स्कूटर उचलून पोलिसांच्या दिशेने भिरकावली.

दिल्लीसोबतच गुजरात, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांतही मोटर वाहन कायद्याच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटतायत. गुजरात सरकारने हा दंड कमी करण्याची घोषणा केली आहे.

वाहनचालकांना भुर्दंड

1 सप्टेंबरपासून नवा मोटर वाहन कायदा लागू झाल्यानंतर वाहनचालकांना भुर्दंड बसला. गुरगावमध्ये एका दुचाकीस्वाराला 56 हजार रुपयांचा दंड बसला. त्याचबरोबर एका ट्रकचालकालाही 41 हजार 700 रुपयांचा दंड झाला.

या कायद्याला जोरदार विरोध झाल्यानंतर गुजरात सरकारने हा दंड कमी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय राज्य सरकार घेऊ शकत नाही, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं होतं. गुजरातनंतर आता छत्तीसगड आणि राजस्थानमधूनही हा दंड कमी केल्याच्या बातम्या येत आहेत.

=======================================================================================

वाहतूक पोलिसाची मुजोरी! सर्वसामान्यावर दमदाटी करत मारली लाथ VIDEO VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 11, 2019 07:17 PM IST

ताज्या बातम्या