राहुल गांधींसाठी या काँग्रेस कार्यकर्त्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

राहुल गांधींसाठी या काँग्रेस कार्यकर्त्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजीनामा देऊ नये म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांची वेगवेगळ्या प्रकारे मनधरणी करत आहेत. पण राहुल गांधी काही मानायला तयार नाहीत. आता तर एका कार्यकर्त्याने काँग्रेसच्या कार्यालयासमोर झाडाला फास लटकवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

  • Share this:

नवी दिल्ली, 2 जुलै : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजीनामा देऊ नये म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांची वेगवेगळ्या प्रकारे मनधरणी करत आहेत. पण राहुल गांधी काही मानायला तयार नाहीत.

आता तर एका कार्यकर्त्याने काँग्रेसच्या कार्यालयासमोर झाडाला फास लटकवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला तसं लटकत्या अवस्थेत पाहून इतर कार्यकर्ते सावध झाले आणि त्यांनी त्याला झाडावरून खाली उतरवलं.

राहुल गांधींनी राजीनामा दिला नाही तर मी फास लावून घेऊन आत्महत्या करेन, असं त्याने सांगितलं.

मुंबईत 45 वर्षानंतर झाला तुफान पाऊस, पाहा आजच्या 'तुंबई'चे 45 PHOTOS

राहुल गांधींनी राजीनामा देऊ नये, अशी विनंती काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते त्यांना करत आहेत. गेले काही दिवस काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर बाहेर कार्यकर्ते धरणं धरून बसले आहेत.

राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम

काँग्रेसच्या कार्यकारिणीची गुरुवारी सोनिया गांधई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात राहुल गांधींनी राजीनामा मागे घ्यायला स्पष्ट नकार दिला. या बैठकीत काँग्रेसच्या 51 खासदारांनी राहुल गांधींना राजीनामा मागे न घेण्याची विनंती केली. पण राहुल गांधी ठाम राहिले.त्यामुळे आता काँग्रेसचे नवे अध्यक्ष कोण याची चर्चा सुरू झाली आहे. सोनिया गांधींनी या जबाबदारीसाठी सुशीलकुमार शिंदे यांना फोन केला, अशीही खबर आहे.

सभांचा प्रभाव नाही

या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी उत्तर प्रदेशात चांगला प्रचार केला होता. राहुल गांधींनी इथे 21 सभा घेतल्या. पण काँग्रेसला इथे यश मिळालं नाही. मध्य प्रदेशमध्येही फक्त एकच जागा मिळाली. स्वत: राहुल गांधींचाही अमेठीमध्ये पराभव झाला. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राहुल गांधींनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

===============================================================================================

VIDEO: मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय, बुडता बुडता वाचले 2 बाईकस्वार

First published: July 2, 2019, 4:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading