'CRPF'चा ताफा स्फोटकांनी उडवायचा होता, दहशतवाद्याचा कबुली देणारा VIDEO

बनिहाल येथे कारमध्ये स्फोट घ़डवून आणणाऱ्या दहशतवाद्याला अटक

News18 Lokmat | Updated On: Apr 1, 2019 10:28 PM IST

'CRPF'चा ताफा स्फोटकांनी उडवायचा होता, दहशतवाद्याचा कबुली देणारा  VIDEO

श्रीनगर, 1 एप्रिल : बनिहाल शहरापासून काही अंतरावर एका कारमध्ये स्फोट घडवून आणल्याप्रकरणी ओवैस अमीन राथेर याला पोलिसांनी अटक केली आहे. शोपियान जिल्ह्यातील वैल गावात राहणाऱ्या ओवैसला एका तपास पथकाने ताब्यात घेतले. तो एका वाहनातून पळून जाण्याच्या तयारीत होता.

ओवैसला ताब्यात घेतल्यानंतर दिलेल्या जबाबात त्याने म्हटलं की, ताफ्याला उडवायचं आहे, असं मला सांगण्यात आलं होतं. गाडीमध्ये काय-काय होतं हे मला माहिती नाही. मला केवळ इतकंच सांगण्यात आलं गाडी चालवायची आहे आणि बटण दाबायचं आहे. ताफ्याजवळ पोहोचताच बटण दाबायचं आहे. बटण दाबल्यानंतर मी तेथून पळून आलो.गेल्या शनिवारी जम्मूकडे जाणाऱ्या सीआरपीएफ जवानांच्या वाहनांचा ताफा गेल्यानंतर काही वेळातच एका कारमध्ये स्फोट झाला होता. यात सीआरपीएफच्या एका वाहनाचं नुकसानही झालं. त्यानंतर ओवैस पळून जाण्यात यशस्वी झाला होता.

Loading...ओवैसला बनिहाल येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला 8 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याची ओळख पटण्यासाठी सीसीटीव्ही फूटेजची मदत झाली. तसेच त्याच्या चेहऱ्यावर आणि शरिरावर झालेल्या जखमांमुळे संशयातून त्याला ताब्यात घेतलं होतं.

दरम्यान, घटनास्थळी मिळालेल्या पत्रावरून चालकाचे नाव समजले होते. तो हिजबुल मुजाहिद्दीनचा सदस्य ओवैस अमीन असल्याचे समोर आले होते. त्यात पुलवामात झालेल्या हल्ल्यासारखाच आणखी एक हल्ला करण्याचा उल्लेख होता.

VIDEO: 'या नेत्याला ओळखा आणि 101 रुपये मिळवा'


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 10:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...