दोन नव्हे भारताने तीन वेळा सर्जिकल स्टाईक, केंद्रीय गृहमंत्र्यांनी केला दावा

दोन नव्हे भारताने तीन वेळा सर्जिकल स्टाईक, केंद्रीय गृहमंत्र्यांनी केला दावा

केंद्रातील मोदी सरकारने दोन वेळा नव्हे तर तीन वेळा सर्जिकल स्टाईक केल्याचा दावा गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला.

  • Share this:

मंगळुरु, 09 मार्च: केंद्रातील मोदी सरकारने दोन वेळा नव्हे तर तीन वेळा सर्जिकल स्टाईक केल्याचा दावा गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला. कर्नाटकातील मंगळुरु येथील एका सभेत ते बोलत होते. गेल्या पाच वर्षात भारतीय लष्कराने तीन वेळा सीमेच्या पलिकडे जाऊन एअर स्टाईक केल्याचे त्यांनी सांगितले.

पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर भारताने 13व्या दिवशी बालाकोट येथे जैशच्या तळावर हल्ला केला होता. यासंदर्भात बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, भारतीय जवानांनी केलेल्या दोन सर्जिकल स्टाईकची माहिती मी तुम्हाला देईन. पण तिसऱ्या स्टाईकची देणार नाही.

देशातील सर्व नागरिकांनी दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी एक झाले पाहिजे. गेल्या पाच वर्षात भारताने सीमा ओलांडून तीन वेळा एअर स्टाईक केला आहे. यातील पहिला स्टाईक उरी हल्ल्यानंतर करण्यात आला होता. त्यानंतर पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर हवाई दलाने बालाकोट येथे जैशचा तळ नष्ट केल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय भारताने आणखी एक सर्जिकल स्टाईक केला होता. पण त्याची माहिती मी नाही देणार असे सिंह म्हणाले.


VIDEO : मुंबईतल्या दादर स्थानकावरील धक्कादायक व्हिडिओ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 9, 2019 06:31 PM IST

ताज्या बातम्या