भारतात कंडोमची जाहिरात दिवसा दाखवण्यावर बंदी

मंत्रालयाच्या मतानुसार या जाहिराती काही विशिष्ट वयांच्या लोकांसाठी आहे. पण या जाहिरातींचा वाईट परिणाम लहान मुलांवर होतो आहे. यामुळे कंडोमवर असलेल्या जाहिराती रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंतच दाखवल्या पाहिजेत असं मंत्रालयाचे म्हणणं आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 12, 2017 12:02 PM IST

भारतात कंडोमची जाहिरात दिवसा दाखवण्यावर बंदी

12 डिसेंबर:  केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयने कंडोमची जाहीरात दिवसा सकाळी सहा वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत दाखवण्यास बंदी आणली आहे. या जाहिरातींमुळे लहान मुलांवर विपरीत  परिणाम होतात म्हणून या जाहिरातींवर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्रालयाच्या मतानुसार या जाहिराती काही विशिष्ट वयांच्या लोकांसाठी आहे.  पण या जाहिरातींचा  वाईट परिणाम लहान मुलांवर होतो आहे. यामुळे कंडोमवर असलेल्या जाहिराती रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंतच दाखवल्या पाहिजेत असं मंत्रालयाचे म्हणणं आहे. मंत्रालयाच्या निर्णयाच्या कंडोम कंपन्यांनी मात्र भरपूर विरोध केला आहे.

आम्ही  जाहिरात यंत्रणेने लावलेले सगळे नियम पाळत असताना देखील असे निर्बंध घालणे चुकीचे आहे असं त्यांचं म्हणणं आहे. एफसीबीच्या अध्यक्ष रोहित ओहिरा यांनी हा निर्णय चुकीचा निर्णय असल्याची टीका केली आहे. सनी लिओनीच्या मॅनफोर्स च्या जाहिरातीमुळे ही बंदी  घालण्यात आल्याची चर्चा आहे. पण त्या एका जाहिरातीमुळे बाकी सर्व जाहिरातींवर का  बंद आणली असा प्रश्न या  कंपन्या विचारत आहेत.

त्यामुळे आता या निर्णयाचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2017 12:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...