Home /News /national /

धक्कादायक! दलित महिला खासदाराची लोकसभेतच मारहाण झाल्याची तक्रार

धक्कादायक! दलित महिला खासदाराची लोकसभेतच मारहाण झाल्याची तक्रार

काँग्रेसच्या एका दलित महिला खासदारानेच आपल्याला सभागृहातच मारहाण झाल्याचा दावा केला आहे. नुसता आरोप नाही तर त्यांनी थेट लोकसभा सभापतींकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली आहे.

    नवी दिल्ली, 2 मार्च :  देशात कायदा आणि सुव्यवस्थाविषयक सर्वोच्च अधिकार असणारं सभागृह असलेल्या लोकसभेतच महिला खासदारांना मारहाण होऊ शकते? खरं तर यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही, पण काँग्रेसच्या एका दलित महिला खासदाराने ही तक्रार केली आहे. आपल्याला सभागृहातच मारहाण झाल्याचा त्यांनी दावा केला आहे. नुसता आरोप करून ही महिला खासदार थांबलेली नाही तर त्यांनी थेट लोकसभा अध्यक्षांकडे लेखी स्वरुपात तक्रार केली आहे. हा प्रकार पहिल्यांदाझाला नसल्याचा खळबळजनक काँग्रेसच्या त्या महिला खासदाराचा दावा आहे. कोण आहेत मारहाण झालेल्या 'त्या' खासदार? काँग्रेसच्या केरळच्या खासदार राम्या हरदास यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून मारहाण केल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसच्या खासदार राम्या यांनी पत्रात भाजपच्या राजस्थानच्या खासदार जसकौर मीणा यांच्यावर थेट आरोप केला आहे. 31 वर्षांच्या केरळच्या खासदार अलाथूर इथून लोकसभेवर निवडून आल्या आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहीलेल्या पत्रात राम्या हरदास यांनी 2 मार्चला लोकसभेच्या आत दुपारी 3 वा. आपल्याला मारहाण झाल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाही तर हा प्रकार पहिल्यांदाच झालेला नाही असंही त्या तक्रारीत नमूद करण्यात तर यापूर्वी सुद्धा आपल्य़ाला लोकसभेच्या सभागृहाच्या परिसरात माहराण झाल्याचा त्यांनी लेखी स्वरुपात आरोप केला आहे. निषेधाचा बँनर सभागृहात फडकवताच माझ्या डोक्यावर मारण्यात आलं असं राम्या हरदास यांचं म्हणणं आहे. मीणा यांचा प्रत्यारोप दरम्यान, काँग्रेसच्या खासदार राम्या यांच्या आरोपांना भाजपच्या खासदार जसकौर मीणा यांनी जोरदार प्रत्योत्तर दिलं आहे. मी कोणालाही मारहाण केलेली नाही. मी राम्या यांना धक्का सुद्धा दिलेला नाही. त्यांनी केलेले सगळे आरोप चुकीचे आहेत, असंही मीणा यांनी म्हटलं आहे. हे वाचा : फाशी पुन्हा लांबणीवर! निर्भयाचे गुन्हेगार पुढच्या आदेशापर्यंत फासावर नाहीत इतकंच नाही तर 'काँग्रेसच्या खासदार राम्या या आपण दलित असल्याचं भांडवल करत असतील तर त्यांना मी सांगू इच्छिते की मी सुद्धा दलित आहे', असं सांगायला सुद्धा भाजप खासदार जयकौर मीणा विसरल्या नाहीत. यापूर्वी सुद्धा केली तक्रार काँग्रेसच्या केरळच्या खासदार राम्या हरदास यांनी आपल्याला मारहाण झाल्याची तक्रार यापूर्वी सुद्धा केली होती. महाराष्ट्रात निवडणुकांच्या नंतर सरकार स्थापनेचा घोळ सुरु होता. त्या दरम्यान सभागृहात निषेधाची घोषणाबाजी करत असतांना दोन खासदारांच्या बरोबरच काही मार्शलनीसुद्धा आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप राम्या यांनी केला आहे.  पण या दोन महिला खासदारांच्या हाणामारीची सुनावणी लोकसभा सभापती ओम बिर्ला कधी घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. अन्य बातम्या पिंपरी चिंचवडमध्ये रक्षक झाले भक्षक, 2 जवानांचं अट्टल चोरांनाही लाजवेल असं कृत्य महाराष्ट्र हादरला! बलात्काराची केस मागे घेण्यासाठी नवरा-बायकोला बेदम मारहाण
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Lok Sabha (Governmental Body), Woman MP

    पुढील बातम्या