'त्या' वादग्रस्त ट्वीटबद्दल केजरीवालांविरोधात भावना दुखावल्याची तक्रार दाखल

कुणीतरी फॉरवर्ड केलेलं... असा मेसेज लिहून अरविंद केजरीवाल यांनी एक ट्वीट केलं ते त्यांना चांगलंच महागत पडलं आहे. त्यांच्याविरोधात धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 23, 2019 06:36 PM IST

'त्या' वादग्रस्त ट्वीटबद्दल केजरीवालांविरोधात भावना दुखावल्याची तक्रार दाखल

नवी दिल्ली, 23 मार्च : कुणीतरी फॉरवर्ड केलेलं... असा मेसेज लिहून अरविंद केजरीवाल यांनी एक ट्वीट केलं, ते त्यांना चांगलंच महागात पडणार अशी चिन्हं आहेत. त्यांच्याविरोधात कथित धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.केजरीवालांनी 21 मार्चला केलेल्या एका ट्वीटनंतर त्यांच्यावर भरपूर टीका झाली. त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं.

केजरीवालांनी केलेला हा मेसेज म्हणजे एक मीम होतं आणि त्यात हातात एक झाडू घेतलेली छायाकृती स्वस्तिकच्या छायाकृतीच्या मागे लागते असं दिसतं.

अरविंद केजरीवाल यांनी कुणीतरी फॉरवर्ड केलेला मेसेज असं म्हटलं असलं तरी हे चित्र वादग्रस्त ठरलं आहे.
झाडू हे केजरीवालांच्या आम आदमी पक्षाचं निवडणूक चिन्ह आहे. स्वस्तिक म्हणजे हिंदुत्ववादाचं प्रतीक समजलं जातं, असं म्हणत अनेक उजव्या विचारांच्या कार्यकर्त्यांनी केजरीवालांवर टीका केली. केजरीवालांवर या ट्वीवरून शरसंधान साधणाऱ्यांमध्ये अनेक भाजपचे नेते आहेत.
ट्विटरवरची ही ट्रोलधाड बघता 'आप'ने याविषयी लगेचच स्पष्टीकरण दिलं. स्वस्तिक हे नाझीवादाचं प्रतीक आहे, असं आपने म्हटलं आहे. केजरीवालांनी ट्वीट केलेलं चित्र हे स्वस्तिकच आहे. नाझी स्वस्तिक उलटं असतं, असं म्हणत ट्विटरकरांनी या स्पष्टीकरणालाही गुंडाळून ठेवलं आहे. आता त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

===============================================================================


निवडणुकीआधीच अशोक चव्हाणांच्या 'या' ऑडिओ क्लीपने उडाली खळबळ


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2019 06:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...