सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, राहुल गांधींच्या विरोधात तक्रार

दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या अल्पसंख्यांक मेळाव्यात राहुल गांधींनी भाजप आणि आरएसएसवर टीका केली होती.

News18 Lokmat | Updated On: Feb 9, 2019 11:12 AM IST

सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, राहुल गांधींच्या विरोधात तक्रार

पुणे, 9 फेब्रुवारी : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. पुण्यातील सिंहगड पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली असून राहुल गांधींनी सावरकरांबद्दल चुकीचं वक्तव्य केल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे.

पोलिसात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत राहुल गांधींनी 7 फेब्रुवारीला दिल्लीत काँग्रेसच्या अल्पसंख्यांक शाखेच्या राष्ट्रीय संमेलनात बोलताना सावरकराबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली. एका स्वातंत्र्यसैनिकाबद्दल अशा भाषेचा वापर करणं हा त्यांचा अपमान असल्याचं तक्रारदारांनी म्हटल आहे.

राहुल गांधींनी भाषणात राफेलवरुन पंतप्रधानांवर हल्लाबोल करताना सावरकरांच्या ब्रिटीशांकडे दया याचिकेचा खिल्ली उडवताना ते म्हणाले होते की, आरएसएस असो किंवा भाजप, मोदी असोत किंवा सावरकर सर्वच भित्रे आहेत.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना राफेल करार आणि अन्य मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींनी वादविवाद करावा असे आव्हानही दिले होते. ते म्हणाले होते की, पंतप्रधानांना भीती वाटते की ते पाच मिनिटंही वादविवादात टिकू शकणार नाहीत. काँग्रेस आता भाजप आणि आरएसएसला पळवत आहे. आम्ही त्यांना राफेल, कृषी संकट आणि रोजगावरुन पळवून लावू असेही राहुल गांधी म्हणाले होते.

राहुल गांधी यांनी त्या भाषणात भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट केलं होतं. मोदींना कुठलंही धोरण नाही, नोटबंदी लावून त्यांनी गरीबांना रांगेत उभे केलं. रोजगार हिरावून घेतला. ते प्रमाणिक नसल्याने माझ्या डोळ्यात डोळे घालून ते बोलू शकत नाही अशी टीका त्यांनी केली होती. मोदींना माझ्या समोर चर्चेला आणलं तर ते 10 मिनिटेही बोलू शकणार नाहीत. स्टेजवरून पळून जातील असंही राहुल गांधी म्हणाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2019 11:12 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...