मराठी बातम्या /बातम्या /देश /

भाजप Vs सेना वाद पेटला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात यूपीमध्ये तक्रार

भाजप Vs सेना वाद पेटला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात यूपीमध्ये तक्रार

या निर्णयामुळे राज्यातील अधिकाऱ्यांच्या निधनामुळे ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीतून त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे

या निर्णयामुळे राज्यातील अधिकाऱ्यांच्या निधनामुळे ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीतून त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे

2018 मध्ये उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना चपलेने मारले असते, असं विधान केलं होतं.

  • Published by:  sachin Salve

उत्तर प्रदेश, 25 ऑगस्ट : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना अटक प्रकरणामुळे शिवसेना (shivsena) आणि भाजपमध्ये (bjp) आता वाद पेटला आहे. आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्या विरोधात उत्तर प्रदेशामधील (uttar pradesh police) पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे. तर, बडनेराचे आमदार रवी राणा (ravi rana) यांच्या कार्यकर्त्यांनी अमरावतीत तक्रार दाखल केली आहे.

राणेंच्या अटकेमुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे.  2018 मध्ये उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना चपलेने मारले असते, असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाविरोधात  उत्तर प्रदेशमधील आंबेडकरनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देवून गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजपचे महामंत्री आणि ॲड. बाबा राम यादव यांनी ही तक्रार केली आहे.

आणखी एका महासाथीचं संकट, कोरोनापेक्षाही भयंकर असणार; तज्ज्ञांनी केलं अलर्ट

तर दुसरीकडे, नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानावरुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली होती. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांना "त्याच्याच चपला घेऊन त्यांचं थोबाड फोडावं" असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होते. परंतु, असे कोणत्या मुख्यमंत्र्याबद्दल असे बोलणे योग्य नाही व ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही, अस आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेचे म्हणणं आहे.

बोल्ड आणि बिनधास्त! 'या' अफगाणी पॉपस्टारची होतेय किम कार्देशियनशी तुलना

ज्याप्रमाणे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल करुन अटक करण्यात आली. त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी, अशी तक्रार अमरावती येथील राजापेठ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ही तक्रार आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. या तक्रारीवर मात्र पोलिसांनी यावर अद्याप काही कारवाई केली नाही.

First published:

Tags: BJP