मजूर परत हवे असतील, परवानगी घ्या - योगी सरकारच्या नियमावरून महाराष्ट्रात वाद

मजूर परत हवे असतील, परवानगी घ्या - योगी सरकारच्या नियमावरून महाराष्ट्रात वाद

प्रदेश काँग्रेस प्रवक्त्यांनी योगी सरकारवर विरोध दर्शविला आहे. कोणत्यानी मजुराला दुसऱ्या राज्यात कामासाठी जाण्यासाठी परवानगी घेण्याची गरज नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 25 मे : देशभरातील वाढणाऱ्या कोरोनाच्या (Coronavirus) कहरामुळे चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू आहे. यादरम्यान मोठ्या संख्येने उत्तर प्रदेश व इतर राज्यातील मजूर त्यांच्या गावी परतण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्यात अनेकांना त्रास सहन करावा लागला.

उत्तर प्रदेशातून मोठ्या संख्येने मजूर विविध राज्यांमध्ये कामासाठी जातात. मात्र त्यांना योग्य वागणूक दिली गेली नसल्याचा आरोप करीत योगी आदित्यनाथ सरकारने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसत आहे.

याबाबत अनेकांनी विरोध दर्शविला आहे. प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ता सचिन सावंत यांनी ट्विट करुन योगी सरकारच्या या वक्तव्यावर विरोध दर्शविला आहे. मजुरांना कुठेही नोकरीला जाण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही. यापुढे ते म्हणाले की, योगींकडे उत्तर प्रदेशचा विकास करण्याची दृष्टी नाही, त्यामुळे उत्तर प्रदेशातून मोठ्या संख्येने लोक कामासाठी दुसऱ्या राज्यात स्थलांतरित होतात.

यापुढे कोणत्याही राज्यांना कामासाठी उत्तर प्रदेशातील मजूर हवे असल्यास त्यांना उत्तर प्रदेश सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. विविध राज्यांकडून स्थलांतरित मजुरांची व्यवस्थित काळजी घेतली गेली नसल्याने ते निराश आहेत. सध्या योगी सरकार या संकटाच्या काळात घरी परतलेल्या मजूर व कामगारांसाठी उपाययोजना करण्याचा विचार करीत आहे. राज्यांतर्गत काही रोजगार सुरू करता येऊ शकतो का, याबाबत चर्चा सुरू आहे. जेणेकडून पुढल्या वेळेस त्यांना नोकरीच्या शोधात अन्य राज्यांत स्थलांतरित होण्याची गरज भासणार नाही. आतापर्यंत 14.75 लाख कामगारांना व मजुरांचं स्किल मॅपिंगचे काम पूर्ण झाले आहे. त्याशिवाय मजुरांना सोशल सिक्युरिटी मिळत असल्यास त्यांना दुसऱ्या राज्यात कामासाठी पाठविण्यात येणार आहे.

हे वाचा -पडद्यामागे मोठ्या हालचाली? शरद पवारांच्या पाठोपाठ राणेही राज्यपालांना भेटणार

First published: May 25, 2020, 3:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading