बजेटआधीच सर्वसामान्यांना फटका! गॅस सिलिंडर 225 रुपयांनी महागले, असे आहेत नवे दर

बजेटआधीच सर्वसामान्यांना फटका! गॅस सिलिंडर 225 रुपयांनी महागले, असे आहेत नवे दर

सर्वसाधारण अर्थसंकल्पआधी (Budget 2020) व्यावसायिक गॅस सिलिंडर्सच्या किंमती वाढल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 फेब्रुवारी : सर्वसाधारण अर्थसंकल्पआधी (Budget 2020) व्यावसायिक गॅस सिलिंडर्सच्या किंमती वाढल्या आहेत. सलग पाचव्या महिन्यात गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळं आता सर्वसामन्यांना जास्त पैसे खर्च करावे लागतील. वाणिज्यिक गॅस सिलिंडरमध्ये (Commercial gas cylinder) 224.98 रुपयांची वाढ झाली आहे. त्याच वेळी देशांतर्गत एलपीजीच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

व्यावसायिक गॅस सिलिंडरची वाढीव किंमत

वाणिज्य गॅस सिलिंडरवर 224.98 रुपयांची वाढ केली आहे. या वाढीनंतर व्यापा्यांना आता व्यावसायिक सिलिंडर्ससाठी 1550.02 रुपये द्यावे लागतील. शनिवारी वाढीव किंमती लागू झाल्या आहेत.

वाचा-मोदींच्या ड्रीम योजनेने तोडले उद्योजकाचे स्वप्न, सुसाईड नोट लिहून केली आत्महत्या

घरगुती गॅस 749 रुपयांना मिळणार

घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. गेल्या पाच महिन्यांपासून किंमती सातत्याने वाढतच होती. त्याचबरोबर आज सर्वसामान्यांनाही दिलासा मिळाला आहे. म्हणजेच, 14.2 किलो सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. फेब्रुवारीमध्ये तुम्हाला 14.2 किलो सिलिंडर फक्त 749 रुपयांना मिळेल. याशिवाय ग्राहकांच्या खात्यात 238.10 रुपये अनुदान दिले जाईल.

वाचा-LIVE Budget 2020 : 27 कोटी लोक दारिद्ररेषेच्या वर आले, हे मोठं यश

सरकार 12 सिलिंडरवर अनुदान देते

सध्या सरकार एका घरात प्रत्येक घरासाठी 14.2 किलोचे 12 सिलिंडर्स अनुदान देते. जर तुम्हाला यापेक्षा जास्त सिलिंडर हवे असतील तर तुम्हाला बाजारभावाने खरेदी करावी लागेल. सरकार दरवर्षी 12 सिलिंडरवर दिले जाणारे अनुदान असले तरी याची किंमत देखील दरमहा महिन्यात बदलत असते. सरासरी आंतरराष्ट्रीय बेंचमार्क आणि परकीय चलन दरात बदल यासारख्या घटक अनुदानाची रक्कम निश्चित करतात.

वाचा-कॉन्स्टेबलच्या 900हून अधिक जागांसाठी भरती, असा करा अर्ज

साबणाच्या किमतीही वाढणार

याशिवाय एफएमसीजी कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) देखील साबणाच्या किंमती वाढवेल. साबणाच्या किंमतीत 6 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. आता आपल्याला साबण विकत घेण्यासाठी अधिक पैसे द्यावे लागतील. एचयूएलचे मुख्य वित्त अधिकारी श्रीनिवास पाठक म्हणाले की, गेल्या सहा महिन्यांत पाम तेलाच्या किंमतीत 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हे लक्षात घेता आम्ही साबणाच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या लोकप्रिय ब्रँडमध्ये डोव्ह, लक्स, लाइफबॉय, पियर्स, हमाम, लिरिल आणि रेक्सोना यांचा समावेश आहे.

First published: February 1, 2020, 11:46 AM IST

ताज्या बातम्या