परराज्यातून आलेल्यांना करणार नाही क्वारंटाईन, 15 जूनपासून या राज्यातील सर्व केंद्रे करणार बंद

परराज्यातून आलेल्यांना करणार नाही क्वारंटाईन, 15 जूनपासून या राज्यातील सर्व केंद्रे करणार बंद

सोमवारपर्यंत या राज्यात 5 हजार क्वारंटाईन केंद्रामध्ये सुमारे 13 लाख लोकांची नोंदणी झाली आहे.

  • Share this:

पटना, 2 जून : सध्या राज्यांमधून प्रवास करणाऱ्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवून त्यांचं निरीक्षण केलं जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी हे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान एका राज्य सरकारने परराज्यातून येणाऱ्यांसाठी केलेले सर्व क्वारंटाईन सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

बिहारमध्ये परत येणारे प्रवासी कामगार, विद्यार्थी किंवा इतर लोकांना यापुढे क्वारंटाईन केले जाणार नाही. यासह राज्यातील सर्व ब्लॉक स्तरीय क्वारंटाईन सेंटर 15 जूनपासून बंद करण्यात येणार आहेत. नितीश सरकारने निर्णय घेतला आहे की, आता जो कोणी परत येईल त्यांची क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यासाठी नोंदणी केली जाणार नाही. सोमवारपर्यंत राज्यातील (बिहार) 5 हजार क्वारंटाईन केंद्रामध्ये सुमारे 13 लाख लोकांची नोंदणी झाली आहे.

आरोग्यावर देखरेखीचे काम चालू राहील

बिहार आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रधान सचिव सुप्रिया अमृत यांनी सांगितले की, आम्ही 30 लाखाहून अधिक स्थलांतरितांना परत आणले असून सोमवारी संध्याकाळपासून नोंदणी थांबवित आहोत. त्या म्हणाल्या की, डोर-टू-डोर हेल्थ मॉनिटरींग सुरूच राहिल आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून लेव्हल 1 आणि 2 हॉस्पिटलपर्यंत वैद्यकीय सुविधा समान राहील.

2700 हून अधिक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

बिहारमध्ये परत आलेल्या बऱ्याच स्थलांतरित मजुरांमध्ये कोविड - 19ची पुष्टी झाली आहे. सोमवारपर्यंत राज्यात कोरोना विषाणूची लागण होण्याचे प्रमाण 3945 होते, त्यापैकी 2743 स्थलांतरित आहेत. आपत्ती विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार हे सर्वजण 3 मे नंतर बिहारला परतले आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले बहुतेक प्रवासी महाराष्ट्रातून परत आले आहेत. येथून आलेल्या 677 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय दिल्लीतील 628, गुजरातमधील 405 आणि हरियाणामधील 237 लोकांचा यात समावेश आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि तेलंगणा तसेच इतर राज्यामधून परत आलेल्या परप्रांतीयांमध्येही कोरोनाची लागण झाली आहे.

31 मे रोजी सरकारने केलेल्या घोषणेनुसार ब्लॉक स्तरावरची सर्व क्वारंटाईन केंद्रे 15 जूनपासून बंद केली जातील. बिहारमध्ये देशातील इतर राज्यांमधून परत आलेल्या परप्रवासी कामगारांना सामावून घेण्यासाठी सरकारने ब्लॉक स्तरावर अशी अलग ठेवणे केंद्र करण्याचे आदेश दिले होते.

हे वाचा-दिल्ली हिंसाचाराचा मोठा खुलासा; ताहिर हुसेनच्या आरोपपत्रात उमर खालिदचेही नाव

First published: June 2, 2020, 3:36 PM IST

ताज्या बातम्या