• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • पेट्रोलची किंमत पोहोचली 100 रुपयांवर; प्रसिद्ध कॉमेडियनला मात्र वेगळ्याच कारणांनी मनस्ताप

पेट्रोलची किंमत पोहोचली 100 रुपयांवर; प्रसिद्ध कॉमेडियनला मात्र वेगळ्याच कारणांनी मनस्ताप

shyaam Rangeela

shyaam Rangeela

कॉमेडियन श्याम रंगीला याने पेट्रोल भाव वाढीसंदर्भात एक व्हिडिओ केला होता, तो सध्या खूप व्हायरल होत आहे

 • Share this:
  राजस्थान, 20 फेब्रुवारी: पेट्रोल आणि डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. देशभरात पेट्रोलने नव्वदीचा टप्पा ओलांडला असून राजस्थानमध्ये तर शंभर रुपये प्रतिलिटर असा पेट्रोलचा भाव झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांना याची झळ बसतच आहे. पण कॉमेडियन श्याम रंगीलाला मात्र वेगळ्याच कारणामुळे पेट्रोलच्या या वाढत्या किमतीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कॉमेडियन श्याम रंगीला हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाजाची नक्कल करून कॉमेडी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. या त्याच्या वेगळ्या स्टाईलमुळे युट्युबवर त्याचे खूप सारे चाहते आहेत. नुकताच श्याम रंगीलाने पेट्रोलच्या वाढत्या किमतीबाबत एका पेट्रोल पंपावर जाऊन मोदींच्या आवाजात एक व्हिडीओ बनवला होता. तो व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होत असतानाच आता मात्र पेट्रोल पंपच्या संचालकाने जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये शाम रंगीला विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या व्हिडीओ मध्ये श्याम रंगीला पेट्रोलच्या वाढलेल्या दरांबाबत बोलताना म्हणतोय की, ‘ राजस्थानच्या श्रीगंगानगर येथे राहणाऱ्या लोकांची छाती आज अभिमानाने भरून आली असेल. इथे पेट्रोलची किमत आज 100 रुपयांपर्यंत जाऊन पोहचली आहे. भारताच्या इतिहासामध्ये अजून असं कोणतंही सरकार आलं नसेल ज्यांनी पेट्रोलला त्याची खरी किंमत मिळवून दिली असेल. आम्ही पेट्रोलला त्याची खरी किंमत मिळवून दिलीये...’ श्रीगंगानगरमधील हनुमानगड रोडवर असलेल्या पेट्रोल पंपावर हा व्हिडिओ तयार केल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता ‘सुरेंद्र अग्रवाल’ या ऑपरेटरने कॉमेडियन श्याम रंगीलाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी शुक्रवारी सदर पोलीस ठाण्यात केली आहे. खासगी तेल कंपनीच्या दबावाखाली येऊन  पेट्रोल पंपच्या संचालकाने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनीने पेट्रोल पंपच्या संचालकाला सांगितलं की जर गुन्हा दाखल केला नाही तर तुमच्या पंपचा पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा बंद होईल.

  अवश्य वाचा -  Farmer Protest: लाल किल्ल्यावरील हिंसाचाराचा आरोपी लक्खा सिंगचं दिल्ली पोलिसांना थेट आव्हान

  पेट्रोल पंपच्या संचालकाने पोलिसांना सांगितले की श्याम रंगीलाने त्याला पत्रकार बनून फोन केला होता. आणि काही फोटो घ्यायचे आहेत असं सांगितलं होत. त्यानुसार 17 फेब्रुवारीला संध्याकाळी  5.30 ते 6.00 च्या दरम्यान काही लोक बाईकवरून पंपावर आले होते. यावेळी पंपावर गर्दी अधिक असते म्हणून त्यांनी व्हिडीओ बनवल्याच कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं नाही. श्याम  रंगीलाला मात्र लोकांकडून पाठिंबा मिळत असून त्याचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.
  Published by:news18 desk
  First published: