मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कर्नल पुरोहित यांना जामीन मंजूर

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कर्नल पुरोहित यांना जामीन मंजूर

  • Share this:

नवी दिल्ली,21 ऑगस्ट: 2008 मधल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सुप्रीम कोर्टाने कर्नल पुरोहित यांना मोठा दिलासा दिलाय.  9 वर्षं तुरुंगात असलेले कर्नल पुरोहित यांना अखेर जामीन मंजूर झालाय.

तब्बल 9 वर्षांनी कर्नल पुरोहित जामिनावर बाहेर येत असल्यानं त्यांची पत्नी अपर्णा पुरोहित यांना अश्रू अनावर झाले. एनआयएनं सुप्रीम कोर्टात पुरोहित यांच्या जामिनाला विरोध केला होता. पण कोर्टानं कर्नल पुरोहित यांना जामीन मंजूर केल्यानं एनआयएला मोठा झटका बसलाय.

मे महिन्यात मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला मुंबई हायकोर्टातून जामीन मिळाला होता.

काय आहे प्रकरणं

मालेगावात मशिदीबाहेर सप्टेंबर 2008 मध्ये स्फोट

स्फोटात 7 जणांचा मृत्यू, शंभरहून अधिक जखमी

मालेगाब बॉम्बस्फोटासाठी आरडीएक्स उपलब्ध करून दिल्याचा आरोप

मालेगाव बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आरोप

कर्नल पुरोहितना नोव्हेंबर 2008मध्ये एटीएसकडून अटक

कर्नल पुरोहित यांना 9 वर्षं तुरुंगवास

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2017 10:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading