कोलंबोतील बॉम्बस्फोटात JDSच्या 7 कार्यकर्त्यांचा मृत्यू

कोलंबो येथील स्फोटात जेडीएसच्या 7 कार्यकर्त्यांचा देखील मृत्यू झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 22, 2019 11:48 AM IST

कोलंबोतील बॉम्बस्फोटात JDSच्या 7 कार्यकर्त्यांचा मृत्यू

कोलंबो, 22 एप्रिल : श्रीलंकेची राजधानी कोलंबोसहीत देशातील काही ठिकाणी एकूण 8 साखळी बॉम्बस्फोट रविवारी (21 एप्रिल) घडवण्यात आले. ईस्टर संडेच्या दिवशी तीन चर्च आणि तीन फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये 8 साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. या भीषण बॉम्बस्फोटांमुळे श्रीलंका हादरली. यामध्ये 200 हून अधिक निष्पापांचा बळी गेला आहे. मृतांमध्ये भारतीयांसह 35 हून अधिक परदेशी नागरिकांचा समावेश आहे. तर 500हून जास्त जण जखमी झाले आहेत. हल्ल्यामध्ये मृत झालेल्यांमध्ये आता कर्नाटकातील जनता दल ( सेक्युलर )च्या सात कार्यकर्त्यांचा देखील समावेश आहे. कार्यकर्ते हे फिरण्यासाठी म्हणून श्रीलंकेतील कोलंबो येथे गेले होते.

याबद्दल माहिती देताना मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी '2 जणांची ओळख पटली असून 3 मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. तर, दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती दिली. जेडीएसचे कार्यकर्ते हे बंगळूरूमधील आहेत.


Loading...'विरोधकांनी साध्वी प्रज्ञांवर खोटे खटले दाखल केले', अमित शहांकडून पाठराखण


हल्ल्याबद्दलच्या सुचनेकडे दुर्लक्ष?

दरम्यान,'आत्मघाती हल्ले होऊ शकतात अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. पण कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही', असा गौप्यस्फोट श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल विक्रमसिंगे यांनी केला आहे.विक्रमसिंगे म्हणाले की, 'श्रीलंकेचे पोलीस प्रमुख पुजुथ जयासुंदरा यांनी आठवडापूर्वी सतर्कतेचा इशारा दिला होता. मात्र कोणतीही खबरदारी घेतली गेली नाही'. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.


SPECIAL REPORT : पवार, मोहिते पाटील आणि मुख्यमंत्री...माढ्यात जोरदार संघर्ष

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: sri lanka
First Published: Apr 22, 2019 11:48 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...