'श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटानं न्यूझीलंडमधील हल्ल्याचा बदला घेतला'

'श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटानं न्यूझीलंडमधील हल्ल्याचा बदला घेतला'

कोलंबो येथे झालेल्या बॉम्बस्फोटानंतर आता हल्ल्याचा उद्देश काय होता? यावर चर्चा सुरू झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, ऐश्वर्य कुमार, 23 एप्रिल : रविवारी ईस्टर डेच्या दिवशी श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट झाले. त्यामध्ये 290 लोकांचा जीव गेला. याबद्दल भारताचे माजी राजनैतिक अधिकारी जी. पार्थसारथी यांनी बोलताना, न्युझीलंडमधील मस्जिदमध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी कोलंबो येथे बॉम्बस्फोट केल्याचं म्हटलं आहे. याकरता दहशतवाद्यांनी अशा देशाची निवड केली ज्याचा कुणी विचार देखील केला नव्हता. अशी प्रतिक्रिया दिली.

यावर अधिक बोलताना पार्थसारथी यांनी श्रीलंकेतील तरूण हे सीरियामध्ये जाऊन दहशतवादी संघटना आयएसआयमध्ये सहभागी झाल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत अशी माहिती दिली. कोलंबोतील हल्ले हे ईस्टरच्या दिवशी झाले. त्यादिवशी चर्चमध्ये मोठ्या प्रमाणात लोक गोळा होतात. त्यामुळे न्युझीलंड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हल्ले झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचं पार्थसारथी यांनी म्हटलं आहे.

2002 गुजरात दंगल : बिल्किस बानो प्रकरणात 17 वर्षानंतर न्यायालयाचा मोठा निर्णय

आणीबाणी लागू

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना यांनी सोमवार मध्यरात्रीपासून देशभरात आणिबाणी लागू केली आहे. ख्रिश्चनधर्मियांच्या ईस्टर डे ला चर्च आणि हॉटेलमध्ये 8 बॉम्बस्फोट करण्यात आले. यामध्ये सुमारे 290 जण मृत्युमुखी पडले तर 450 जखमी आहेत.

दहशतवाद्यांनी इस्टरच्या दिवशी पहिला स्फोट सकाळी पावणेनऊ वाजता सेंट अँथनी कॅथलिक चर्चमध्ये झाला. दुसरा स्फोट शहराच्या बाहेरच्या भागातल्या नेगोंबोमध्ये सेंट सॅबेस्टियन चर्चमध्ये झाला. त्यानंतर लगेचच कोलंबोपासून 300 किमी अंतरावरच्या बॅक्टिलो शहरात तिसऱ्या चर्चमध्येही स्फोट झाल्याची बातमी आली.

साध्वी प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीविरोधात मुंबईच्या NIA कोर्टात याचिका

चर्चेसना केलं लक्ष्य

कोलंबोच्या 3 फाइव्ह स्टार हॉटेलमध्येही स्फोट घडवण्यात आले. शांग्रिला, सिनेमॉन ग्रँड आणि किंग्जबरी या हॉटेल्सना लक्ष्य करण्यात आलं होतं. त्यानंतर कोलंबोच्या नॅशनल झू जवळ एका हॉटेलमध्ये आणि डमेटोगोडामध्ये एका घरातही स्फोट झाला.

श्रीलंकेच्या पोलीस दलाने दहा दिवस आधीच या आत्मघातकी हल्ल्यांचा इशारा दिला होता. अतिरेकी देशातल्या चर्चेसना लक्ष्य करू शकतात, असंही पोलीस दलाने म्हटलं होतं.

या स्फोटांमागे नॅशनल तौहिद जमात या दहशतवादी संघटनेचा हात आहे, असं म्हटलं जातं. तामिळनाडूमध्येही या संघटनेच्या एका गटाच्या कारवाया सुरू आहेत. पण आतापर्यंत या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.

VIDEO: पंतप्रधान मोदींबाबत काय बोलले नारायण राणे?

First published: April 23, 2019, 2:54 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading