दिल्लीत रेकॉर्डब्रेक थंडी, पारा 2.4 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला

दिल्लीत रेकॉर्डब्रेक थंडी, पारा 2.4 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला

29 डिसेंबरपर्यंत दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली,28 डिसेंबर: देशाची राजधानी दिल्लीत रेकॉर्डब्रेक थंडी पसरली आहे. दिल्लीत अनेक भागात धुक्याची चादर पसरली असून शनिवारी पारा 2.4 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. यंदाच्या मोसमातील हे सर्वात निच्चांकी तापमान आहे.

हवामान विभागाने दिलेली माहिती अशी की, गेल्या 118 वर्षांचा रेकॉर्ड मोडत डिसेंबर महिन्यात थंडीमुळे दिल्लीकरांमध्ये हु़डहुडी भरली आहे. डिसेंबरमधील कमाल तापमानाचा पारा 20 अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. दिल्लीतील सफदरजंग परिसरात तापमानाचा पारा 2.4 अंश सेल्सिअसपर्यंत आला आहे. दिल्लीतील किमान तापमान 3.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. याआधी 1901 मध्ये डिसेंबर महिन्यात एवढी थंडी पडली होती. दरम्यान, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये झालेल्या तुफान हिमवृष्टीमुळे दिल्लासह उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे.

ऑरेंज अलर्ट जारी

थंडी आणि दाट धुक्यामुळे हवामान विभागाने 29 डिसेंबरपर्यंत दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील आठवड्यात वाऱ्याची दिशा बदल्यास हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीकरांना थंडीपासून थोडासा दिलासा मिळू शकतो.

दोन दशकातील सर्वात निच्चांकी तापमान

डिसेंबर महिन्यातील दोन दशकातील हे सर्वात निच्चांकी तापमान आहे. याआधी 1997 साली पहिल्यांदा दिल्लीकरांनी एवढ्या थंडीचा अनुभव घेतला होता. दिल्लीत सलग 13 दिवस अशी कडाक्याची थंडी पडली होती. डिसेंबर महिन्यातील कमाल तापमान 20 अंश सेल्सिअस पेक्षा कमी 1919, 1929, 1961 आणि 1997 मध्ये दिल्लीकरांनी अनुभवले होते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी म्हणजे गुरुवारी कमाल तापमान 19.85 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले होते. गेल्या दोन आठवड्यांपासून दिल्लीसह उत्तर भारतात कडाक्याची थंडी पसरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 28, 2019 09:25 AM IST

ताज्या बातम्या