S M L

दिल्ली,उत्तर भारतात थंडीची लाट, राज्यात हुडहुडी!

राज्यासह दिल्ली आणि एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे. नाशिक पुणे आणि नागपूर या महत्त्वाच्या शहरांना हुडहुडी भरवणाऱ्या थंडीची. या तिन्ही शहरांमध्ये पारा 10 अंशाच्या खाली घसरलाय.

Sonali Deshpande | Updated On: Jan 6, 2018 12:10 PM IST

दिल्ली,उत्तर भारतात थंडीची लाट, राज्यात हुडहुडी!

06 जानेवारी : राज्यासह दिल्ली आणि एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे. नाशिक पुणे आणि नागपूर या महत्त्वाच्या शहरांना हुडहुडी भरवणाऱ्या थंडीची. या तिन्ही शहरांमध्ये पारा 10 अंशाच्या खाली घसरलाय.पुण्याचं तापमान 9 अंश सेल्सिअस, नाशकाचं तापमान 8 तर नागपूरचं तापमानही 9 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय. जणू या शहरांचं सध्या महाबळेश्वर झालंय.

तर दुसरीकडे राजधानी दिल्लीत तापमानाचा पारा चांगलाच घसरल्याने 10 जानेवारीपर्यंत दिल्ली जवळच्या नोएडामध्ये आठवीपर्यंतच्या शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. याशिवाय, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिशासह संपूर्ण उत्तर आणि पूर्व भारतात थंडीचा जोर वाढला आहे. राजधानी दिल्लीचं तापमान आज कमाल 18 डिग्री ते किमान सात डिग्री सेल्सिअसवर राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. दाट धुक्यामुळे अनेक ट्रेन आणि विमान उड्डाणे उशिराने होत आहेत.

दिल्लीला जाणाऱ्या 18 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर 49 ट्रेन उशीराने धावत आहेत. तसेच 13 एक्स्प्रेस ट्रेनची वेळही बदलण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

राज्यात हुडहुडी (अंश सेल्सिअस)

मुंबई 16

Loading...

ठाणे 25

रायगड 18

रत्नागिरी 18

सिंधुदुर्ग 17

पुणे 11

नाशिक 8

कोल्हापूर 16

सांगली 14

सातारा 12

जळगाव 9

अहमदनगर 10

सोलापूर 16

उस्मानाबाद 16

बीड 12

औरंगाबाद 11,

बुलढाणा 13

परभणी 11

नांदेड 13

अमरावती 12

नागपूर 9

वर्धा 9

यवतमाळ 12

चंद्रपूर 10

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 6, 2018 12:10 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close