बिकानेर, 12 सप्टेंबर : राजस्थानमधील बिकानेर (Bikaer) जिल्ह्यामध्ये शनिवारी एका अपघातामध्ये भारतीय सैन्यातील दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या संदर्भात माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात बिकानेर-जयपूर राष्ट्रीय महामार्गावर झाला. सैन्याची गाडी टायर फुटल्यामुळे नियंत्रणाबाहेर गेली आणि पलटली. यामध्ये दोन सेना अधिकाऱ्यांचे निधन झाले असून अन्य काही जवान गंभीर जखमी झाले आहेत.
सरंक्षण प्रवक्ते कर्नल संबित घोष यांनी अशी माहिती दिली की, 19 व्या रेजिमेंटचे सीओ मनिष सिंह चौहान आणि मेजर नीरज शर्मा यांचे निधन झाले आहे. मनिष सिंह चौहान हृतिक रोशन (Hritik Roshan) च्या मुख्य भूमिका असणाऱ्या 'लक्ष्य' (Lakshya)सिनेमात कॅडेट म्हणून दिसले होते.
(हे वाचा-अरुणाचल प्रदेशमधून बेपत्ता झालेले 5 तरुण चीनने भारताकडे सोपवले!)
सैरूणा पोलीस ठाण्याचे अधिकारी अजय कुमार यांनी सांगितले की पोलिसांनी जखमीं सैनिकांना बिकानेरच्या पीबीएम रुग्णालयात दाखल केले आहे. त्याठिकाणी दोन्ही लष्करी अधिकाऱ्यांना मृत घोषित करण्यात आले. त्याचप्रमाणे दोन जखमी सैनिकांना रुग्णालयात दाखल केले आहे.
An Army vehicle met with an accident on Bikaner-Jaipur road at about 6 am today. Two officers - a Major and a Colonel - suffered fatal injuries. The other injured have been evacuated to hospital: PRO Defence, Rajasthan pic.twitter.com/ouZkgcS9Lq
— ANI (@ANI) September 12, 2020
अशी माहिती समोर येते आहे की, या घटनेत जखमी झालेल्या आणि ठार झालेल्या लष्करी जवानांना उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूर येथे तैनात करण्यात आले होते. सर्व सैनिकी अभ्यासासाठी बिकानेरला येत होते.
(हे वाचा-पोलिसांची कमाल! हरवलेल्या मुलाला गुगल मॅपवरून 24 तासांत शोधलं)
अपघातानंतर सैन्याची वाहने घटनास्थळी दाखल झाल्याचे सांगण्यात आले. जखमींना तातडीने पीबीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. एएसआय शिवकुमार यांनी सांगितले की, शनिवारी पहाटे 5.30 वाजता एका गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात ही सीओंची गाडी पलटली आणि अपघात घडला.