मुंबई, 11 मार्च : मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai International Airport) एका महिलेने शरीराच्या आत कोकेन (Cocaine) या प्रतिबंधित अमली पदार्थांच्या पिशव्या लपवून त्याची तस्करी केल्याची घटना समोर आली आहे. त्या महिलेकडे तब्बल 32 लाख रुपयांचे कोकेन होते.
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, मूळ दक्षिण अमेरिकेतील (South America) बोलिव्हिया या देशाची नागरिक असलेली रिबेरा डेलिशिया ही महिला शरीराअंतर्गत कोकेन लपवून येत असल्याची माहिती डीआरआरला (DRR) मिळाली होती. तिची चौकशी करीत असताना ती काहीतरी लपवत असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आहे. जे.जे. रुग्णालयात (JJ Hospital) तिच्या शरीराचा एक्स-रे काढला असता महिलेच्या पोटात व गुप्तांगात काहीतरी लपवले असल्याचे समोर आले. महिलेच्या शरीरातून तब्बल 13 कोकेनच्या पिशव्या काढण्यात आल्या आहेत.
संबंधित - 13 कंडोममध्ये ड्रग्स भरून लपवले होते प्राईव्हट पार्टमध्ये, अधिकाऱ्यांनी पकडलेच!
महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात दिलेल्या माहितीनुसार ही महिला बोलिव्हियाहून ब्राझिलला गेली होती. तेथे तिने कोकेनच्या तस्करीचा सौदा केला. कोकेन खरेदी करण्यासाठी ते नायजेरियात गेली व तेथे तिने शस्त्रक्रिया करीत कोकेनच्या पिशव्या शरीरांतंर्गत लपवल्या. नायजेरियाहून मुंबईल येण्यासाठी थेट विमान नसल्याने ही महिला पहिल्यांदा इथिओपियाला गेली व तेथून ती मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाली.
संबंधित - पुण्यात कपड्याच्या आडून ड्रग्जचा व्यवसाय, 88 लाखांचे 'कोकेन' जप्तभारतात कोकेनची तस्करीच्या वाढत्या घटना
यापूर्वीही शरीरांतर्गत कोकेन लपवून त्याची तस्करी केल्याच्या अनेक घटना घडल्या आहे. मात्र मुंबईत हे कोकेन कोणाला देणार होते? कोणत्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करुन त्या पिशव्या काढल्या जाणार होत्या? याचा तपास सुरू असून या घटनांमधून भारतात कोकेनच्या तस्करीचे जाळे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.