मराठी बातम्या /बातम्या /देश /आश्चर्य! 4 वर्षांच्या चिमुकल्याला चावताच कोब्राचा तडफडून मृत्यू, मुलगा मात्र ठणठणीत; पाहा VIDEO

आश्चर्य! 4 वर्षांच्या चिमुकल्याला चावताच कोब्राचा तडफडून मृत्यू, मुलगा मात्र ठणठणीत; पाहा VIDEO

विषारी कोब्रा सापाने दंश केल्यानंतरही चिमुकला खेळत राहिला आणि सापाचा तिथंच मृत्यू झाला.

विषारी कोब्रा सापाने दंश केल्यानंतरही चिमुकला खेळत राहिला आणि सापाचा तिथंच मृत्यू झाला.

विषारी कोब्रा सापाने दंश केल्यानंतरही चिमुकला खेळत राहिला आणि सापाचा तिथंच मृत्यू झाला.

पाटणा, 23 जून : एखाद्या साप चावला तर त्याच्या जीवाला धोका असतो  (Snakebite). त्यातही हा साप विषारी कोब्रा असेल तर मग त्याच्या वाचवण्याची शक्यता कमीच (Cobra Snake). असं असताना सापाच्या दंशाचं एक शॉकिंग प्रकरण समोर आलं आहे. एका चिमुकल्याला कोब्राने दंश केला, त्या चिमुकल्याला सापाच्या दंशानंतर काहीच झालं नाही पण त्याला दंश करणारा कोब्राचा मात्र तडफडून मृत्यू झाला आहे. या प्रकरणामुळे सर्वजण हैराण झाले आहेत (Snake died after bitten 4 year child).

देव तारी त्याला कोण मारी असंच बिहारमधील या चार वर्षांच्या चिमुकल्याच्या बाबतीत घडलं. खतरनाक विषारी कोब्रा डसल्यानंतरही त्याला काहीच झालं नाही पण त्या कोब्राचाच मृत्यू झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.

गोपालगंजमधील माधोपूर गावात राहणारा चार वर्षांचा अनुज कुमार आपल्या मामाच्या गावी सासामुसा खजुरी टोलाला गेला होता. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी संध्याकाळच्या वेळेला तो घराच्या दरवाजाजवळ इतर मुलांसोबत खेळत होता. त्याचवेळी शेतातून एक कोब्रा वेगाने त्यांच्या दिशेने आला. क्रोबा सापाने अनुजच्या पायाला दंश केला. अनुजला साप चावताच इतर मुलं घाबरली आणि ती भीतीने तिथून पळू गेली.

हे वाचा - भरमंडपात मेहुणीने केली नवरदेवाची धुलाई; नेमकं काय घडलं पाहा VIDEO

तिथं काही मोठे लोक होते, त्यांचं लक्ष त्या सापाकडे गेलं. तेव्हा त्यांनी अनुजला सापापासून वाचवण्यासाठी धाव घेतली. हातात काठी घेऊन ते सापाला मारायला गेले. पण त्याआधीच सापाचा तडफडून मृत्यू झाला होता. पण ज्या अनुजला हा साप चावला त्याला काहीच झालं नाही. तो आपला पुन्हा खेळू लागला. पाच फूट लांबीचा हा साप होता.

" isDesktop="true" id="721634" >

घाबरलेल्या कुटुंबाने त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं. त्यांनी मृत सापालाही एका डब्यात घेतलं. जेणेकरून सापाला पाहून त्याचा विषाचा अंदाजा लावून डॉक्टरांना उपचार करणं सोपं होईल. डॉक्टरांनी अनुजची तपासणी केली. त्याच्यावर उपचार सुरू केले.

हे वाचा - Shocking! नाश्ता असो वा जेवण... फक्त Dog food खात राहिला तरुण शेवटी...

अनुज आता पूर्णपणे ठिक असून त्याला कोणताच धोका नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पण चिमुकल्याला चावताच सापाचच मृत्यू कसा झाला हे अद्यापही रहस्यच आहे.

First published:

Tags: Bihar, Snake, Viral