अखंड प्रताप सिंह(कानपूर) 18 मार्च : कानपूर प्राणी उद्यानात येणाऱ्या पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कानपूरचा सापग्रहही पाहता येणार आहे. मागच्या 3 महिन्यांसाठी पूर्णपणे बंद असलेले सापग्रह आता सुरू होणार आहे.
मागचे काही महिने हिवाळा असल्याने साप सुस्तावस्थेत जातात. त्यामुळे सापांचे दर्शन घडवणारा विभाग बंद होता. आता हवामानात बदल होताच उन्हाळा सुरू होत असल्याने खुला करण्यात आला आहे. आता चिडिया घरामध्ये येणाऱ्या पर्यटकांना साप पाहायला मिळणार आहेत. याचबरोबर अन्य प्राणीही पाहता येणार आहेत.
पोपटाच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन करण्याची मागणी, नेमका काय आहे हे प्रकरण?
हिवाळा सुरू होताच, सर्व साप प्रजाती थंड हवामानात सुप्तावस्थेत जातात. साप हा थंड रक्ताचा प्राणी आहे. अशा परिस्थितीत बाहेरचे तापमानही थंड झाले तर ते सापांसाठी धोकादायक आहे. त्यामुळे हिवाळा सुरू होताच प्राणीसंग्रहालयातील सापगृह पर्यटकांसाठी बंद केले जाते.
यामुळे पर्यटक देखील येथे खूप कमी भेट देतात, दरम्यान सापांचे संरक्षण करण्यासाठी येथे सर्वती काळजी घेतली जाते. थंडी टाळण्यासाठी ब्लोअर आणि स्ट्रॉची व्यवस्था केली आहे. जेणेकरून सापांना थंडी वाजणार नाही आणि त्यांचा जीव वाचू शकेल.
औषध समजून आईने 4 दिवसांच्या बाळाला दिलं कीटकनाशक, भयानक घटना
कानपूर प्राणिसंग्रहालयातील 12 प्रजातींचे साप आहेत आहेत. ज्यामध्ये पायथन, रसेल वाइपर, साप, कोब्रा, धामीण, घोडा पछाड यांचा समावेश आहे. रेप्टाइल हाऊसमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने येतात व त्याची माहिती घेतात. ती 3 महिन्यांपासून पर्यटकांसाठी बंद होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Python snake, Snake, Uttar pradesh, Uttar pradesh news