Home /News /national /

कोरोनाचं संकट असतांनाच हॉस्पिटलमध्ये घुसला कोब्रा, डॉक्टर्स आणि रूग्णही पळाले बाहेर!

कोरोनाचं संकट असतांनाच हॉस्पिटलमध्ये घुसला कोब्रा, डॉक्टर्स आणि रूग्णही पळाले बाहेर!

त्यानंतर भीतीने वॉर्डमधले सगळे रूग्ण आणि डॉक्टर्स बाहेर पळाले. त्यांची भीती अजुनही गेलेली नाही.

    हमीरपुर 07 सप्टेंबर: देशातल्या सर्वच राज्यांमध्ये कोरोनाचं संकट असतांनाच उत्तर प्रदेशात एक धक्कादायक घटना घडली. कोरोनामुळे सर्वच हॉस्पिटल्सवर ताण आहे. त्यामुळे वाढणारे रूग्ण आणि अपुरे डॉक्टर्स यामुळे त्यांना कामाचा प्रचंड दबाव आहे. अशी परिस्थिती असतांनाच हमीरपूर (Hamirpur) इथल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये एक कोब्रा नाग घुसल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. हमीरपूरमध्ये सामान्य नागरीकांना इथलं सरकारी हॉस्पिटल हा एकमेव सहारा आहे. सोमवारी दुपारी अचानक हॉस्पिटलच्या एका वॉर्डमध्ये काही रूग्णांना साप दिसला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. साप मोठा असल्याने सगळ्यांचीच पाचावर धारण बसली. साप सगळ्या वॉर्डमध्ये फिरत असतांनाच डॉक्टरांनाही ही घटना कळली. त्यानंतर भीतीने वॉर्डमधले सगळे रूग्ण आणि डॉक्टर्स बाहेर पळाले. सुदैवाने या वॉर्डमध्ये गंभीर रूग्ण नव्हते त्यामुळे मोठं संकट टळलं. नंतर एका सर्प मित्राला बोलावण्यात आलं. त्यानंतर त्याने मोठ्या प्रयत्नाने त्या नागला पकडण्यात यश मिळवलं. त्यानंतर सगळा वॉर्ड सॅनिटाईज करण्यात आला आणि रूग्णांना पुन्हा त्यांचे बेड्स देण्यात आले. COVID-19: कोरोनावरच्या या 5 लशींपासून जगाला आहे सर्वात जास्त आशा या घटनेनंतरही रूग्ण आणि नातेवाईंकामधली भीती गेलेली नव्हती. पावसाचे दिवस असल्याने या काळात साप बाहेर येतात. असाच एखादा साप आला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पुढे जास्त काळजी घेऊ असं हॉस्पिटल प्रशासनाने सांगितलं आहे. भारतात Oxford पाठोपाठ दिली जाणार रशियन कोरोना लस; पाहा कधीपासून होणार ट्रायल दरम्यान,  देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा विस्फोट झालेला दिसत आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 42 लाखांहून अधिक झाली आहे. तर, एकाच दिवसात  तब्बल 80 ते 90 हजारांच्या आसपास  रुग्ण सापडत आहेत.देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या सध्या 42 लाख वर गेली आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या