CNN- NEWS18 पुन्हा एकदा ठरलं देशाचं नंबर 1 इंग्लिश न्यूज चॅनेल!

CNN- NEWS18वर 39.2 टक्के प्रेक्षकांनी आपला विश्वास दाखवला आहे. त्यामुळे CNN- NEWS18 पुन्हा एकदा भारतातील नंबर 1 इंग्लिश न्यूज चॅनेल ठरलं आह

News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2019 02:08 PM IST

CNN- NEWS18 पुन्हा एकदा ठरलं देशाचं नंबर 1 इंग्लिश न्यूज चॅनेल!

नवी दिल्ली, 07 जून : CNN- NEWS18वर प्रेक्षकांनी पुन्हा एकदा आपला विश्वास दाखवला आहे. BARCच्या आकडेवारीनुसार CNN- NEWS18 हे भारतातील नंबर 1चं इंग्लिश न्यूज चॅनल ठरलं आहे. शहरी, ग्रामीण भागात देखील प्रेक्षकांनी CNN- NEWS18ला पसंती दिल्याचं BARCच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे. तब्बल 39.2 टक्के प्रेक्षकांनी CNN- NEWS18ला पसंती दिली आहे. वयोगटांचा विचार करता प्रत्येक वयोगटामध्ये देखील CNN- NEWS18ला पसंती मिळाली आहे.

यामध्ये CNN- NEWS18नं Republic TV ( 27. 5 % ), Times Now ( 18.6 % )ला देखील मागे टाकलं आहे. मार्केटचा विचार करता सर्वाधिक प्रेक्षकांनी आपला विश्वास CNN- NEWS18वर दाखवला आहे. Times Now आणि India Todayची आकडेवारी एकत्र केल्यानंतर देखील CNN- NEWS18च्या 39.2 टक्क्याला मागे टाकणं शक्य होताना दिसत नाही.फक्त CNN- NEWS18

Loading...

लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रत्येक टप्प्यामध्ये CNN- NEWS18ची प्रेक्षक संख्या ही वाढताना दिसली. प्रेक्षकांनी CNN- NEWS18वरआपला विश्वास कायम ठेवला. 23 मे या निकालाच्या दिवशी देखील मतमोजणीला सुरूवात झाल्यापासून सर्वाधिक प्रेक्षकांनी CNN- NEWS18वर आपला विश्वास दाखवला. CNN- NEWS18 आणि News18.Comनं निवडणुकीतील प्रत्येक घडामोड प्रेक्षकांपर्यंत अचूक आणि थेट पोहोचवली.

प्रत्येक घटनेचा मागोवा

नेटवर्क18 हा एकमेव ग्रुप आहे ज्याच्या माध्यमातून निवडणुकीची बित्तंबातमी अचूक दाखवली गेली. प्रत्येक ठिकाणाहून येणारी घडामोड दाखवण्यामध्ये नेटवर्क18 आघाडीवर होतं. टीव्ही आणि मोबाईलच्या माध्यमातून लाखो प्रेक्षक नेटवर्क18शी जोडले गेले होते.

निवडणूक आणि निकालाचं वार्तांकन करताना नेटवर्क18नं कल्पक अशा गोष्टींचा वापर केला. ज्यामध्ये आर्टिफिशीअल इंटेलिजन्सचा देखील वापर करण्यात आला होता. अत्यंत सुटसुटीत आणि साध्या, सरळ शब्दांमध्ये निवडणुकीचं, निकालाचं वार्तांकन केलं गेलं. ज्यामुळे शहरी, ग्रामीण आणि प्रत्येक वयोगटातील लाखो प्रेक्षकांना नेटवर्क18वर विश्वास दाखवला.

लोकसभा मतदरसंघानिहाय दाखवली गेलेली माहिती ही अचूक होती. यामध्ये रिपोर्टर, एडीटर, रिसर्च टीमनं महत्त्वपूर्ण बिनचूक अशी माहिती गोळा केली गेली होती. ज्यामध्ये यापूर्वी झालेल्या निवडणुकीसंदर्भातील प्रत्येक आकडेवारी होती. पूर्वीच्या निवडणुकीचा निकाल, विजयी, पराभूत उमेदवारांची माहिती, मतदानाची टक्केवारी आदी बाबींचा समावेश होता.


महापालिकेत अमोल कोल्हेंनी मांडला प्रलंबित कामांचा लेखाजोखा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2019 02:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...