• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • महिला अत्याचाराविरोधात योगी आक्रमक, सार्वजनिक ठिकाणी लावणार आरोपींचे पोस्टर्स

महिला अत्याचाराविरोधात योगी आक्रमक, सार्वजनिक ठिकाणी लावणार आरोपींचे पोस्टर्स

'मिशन दुराचारी' महिलांची छेड काढणाऱ्यांचे फोटो भर चौकात लावणार...

 • Share this:
  लखनौ, 24 सप्टेंबर: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) महिलांवरील अत्याचाराच्या (Crime Against Women) घटनांमध्ये वाढ झाली आहे. यावरून आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिलांविरोधात होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. हेही वाचा..पुणे जम्बो कोविड सेंटरमधून महिला बेपत्ता, लेकीसाठी माऊलीनं निवडला 'हा' मार्ग राज्यात यापुढे कोणालाही महिलांची छेड काढण्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आल्यानंतर शहरामध्ये त्या आरोपीचे पोस्टर लावण्यात येणार आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना आदेश दिले आहेत. महिलांची छेड काढणाऱ्यांचे फोटो लावण्याच्या पोलिसांच्या या मोहिमेला 'मिशन दुराचारी' असं नाव देण्यात आलं आहे. या सर्व मोहिमेची जबाबदारी पोलीस खात्याकडे देण्यात आली आहे. महिला पोलिसांवर 'मिशन दुराचारी'ची जबाबदारी.. 'मिशन दुराचारी'ची संपूर्ण जबाबदारी महिला पोलिसांकडे देण्यात आली आहे. त्याचबरोबर आरोपींवर कारवाई करण्याचे सर्व अधिकार देखील महिला पोलिसांना राहाणार आहेत. महिलांची छेड काढण्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख सार्वजनिक केली जाणार आहे. शहरातील चौका-चौकात आरोपींचे पोस्टर्स लावण्यात येणार आहेत. लखनौमध्ये 'ऑपरेशन शक्ति' दुसरीकडे, उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौ शहरात महिलावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात 'ऑपरेशन शक्ति' अभियान सुरू करण्यात आलं आहे. पोलीस महानिरीक्षक लक्ष्मी सिंह यांनी दिलेल्या निर्देशानुसार उन्नाव, हरदोई, सीतापूर, लखीमपूर, रायबरेली, लखनौ ग्रामीणमध्ये 'ऑपरेशन शक्ति' राबवले जात आहे. या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्थेसोबतच समाजात सतर्कता आणि जागरूकता निर्माण करण्याचं काम करण्यात येत आहे. हेही वाचा...पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 'Time' मध्ये झळकल्या दिल्लीतील शाहीनबागच्या दादी दरम्यान, आतापर्यत 'ऑपरेशन शक्ति'नुसार एका महिन्यात 2200 आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. 822 जणांवर एफआईआर, 699 जणांवर निर्बंध तर 770 जणांना नोटिस बजावण्यात आल्या आहेत. यात दंडात्मक कारवाईचाही समावेश आहे.
  Published by:Sandip Parolekar
  First published: