मुख्यमंत्र्यांचा आदेश,'दुसरं लग्न केल्यास हिंदू पुरुषांवरही पोलीस कारवाई करा'

मुख्यमंत्र्यांचा आदेश,'दुसरं लग्न केल्यास हिंदू पुरुषांवरही पोलीस कारवाई करा'

ट्रिपल तलाक पीडित महिलांची भेट घेतल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोन लग्न करणाऱ्या हिंदू पुरुषांवरही कारवाई करावी असं म्हटलं आहे.

  • Share this:

लखनऊ, 25 सप्टेंबर : एक लग्न केल्यानंतर दुसरं लग्न करणाऱ्या हिंदूंवरदेखील पोलिसांनी कारवाई करावी असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. बुधवारी ट्रिपल तलाक पीडित महिलांची त्यांनी भेट घेतली. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी मुस्लीम महिलांशिवाय हिंदू महिलांच्या अधिकाराबद्दलही मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की आता एका लग्नानंतर दुसरं लग्न करणाऱ्या हिंदू पुरुषांवरसुद्धा कारवाई करा.

योगी आदित्यनाथ म्हणाले की, उत्तर प्रदेशात गेल्या वर्षभरात 273 ट्रिपल तलाकची प्रकरणं समोर आली होती. या सर्व प्रकरणी एफआय़आर दाखल करण्यात आली आहे. मोदींजींनी ट्रिपल तलाकबाबत घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांचे आभार. ज्या महिलांनी ट्रिपल तलाकसाठी लढा दिला त्यांचेही आभार.

ट्रिपल तलाकवर बंदी घालण्याचा आदेश पाच वेळा देण्यात आला होता. शाहबानो प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही पुढे कारवाई झाली नाही. त्यानंतर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत निरपेक्षतेची चर्चा केली गेली. आजही सोशल मीडियावरून ट्रिपल तलाक होत आहेत. अशा परिस्थिती कायद्याची गरज आहे असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

तोडणं सोपं असतं पण जोडणं कठीण असतं. आमची लढाई जोडण्याची आहे. प्रत्येक महिला आणि मुलांना जगण्याचा आणि प्रगती करण्याचा अधिकार मिळायला हवा असं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं.

पुरामुळे 20 दिवसांपासून गावाचा संपर्क तुटला; भीषण अवस्था दाखवणारा VIDEO

Published by: Suraj Yadav
First published: September 25, 2019, 1:48 PM IST
Tags: hindu

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading