Coronavirus : काय आहे CM योगी यांचे 'आग्रा मॉडेल'? जगभरात होतेय चर्चा

Coronavirus : काय आहे CM योगी यांचे 'आग्रा मॉडेल'? जगभरात होतेय चर्चा

प्रत्येक राज्य आपआपल्या परीने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना वापरत आहे. या सगळ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे 'आग्रा मॉडेल' देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

  • Share this:

आग्रा, 13 एप्रिल : कोरोनाव्हायरसपासून देशाला वाचवण्यासाठी सर्व स्थरावर प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक राज्य आपआपल्या परीने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करत आहे. या सगळ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे 'आग्रा मॉडेल' देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. केंद्रिय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनीही आग्रा मॉडेलचं कौतुक केलं आहे. आग्रामध्ये एकूण रुग्णांपैकी 5 रुग्ण निरोगी झाले आहेत. तर, इतर सर्व रुग्णांची प्रकृती ठिक आहे. मात्र या आग्रा मॉडेलची जगभरात चर्चा होत आहे.

उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाच्या क्लस्टर ट्रान्समिशनचे पहिलं प्रकरण आग्रामध्ये समोर आलं. यानंतर संपूर्ण राज्यात सावधगिरी बाळगून त्याअंतर्गत उपाययोजना करण्यास सुरुवात केली. अंतर्गत जिल्ह्यातील सर्व हॉट स्पॉट्स, रॅपिड रिसपॉन्स टीम, मोठ्या प्रमाणात नमुने तयार करणे, कॉल सेंटरची स्थापना, डोअर स्टेप डिलिव्हरी आणि सर्व घरे सॅनिटाईज करण्यात आली. त्यामुळं उत्तर प्रदेशने यावर मात क्लस्टर ट्रान्समिशनची प्रकरणं कमी केली.

वाचा-कोरोना पॉझिटिव्ह PSI च्या संपर्कात आल्यानंतर जितेंद्र आव्हाड होम क्वारन्टाइन

RRPद्वारे संपर्कातून ट्रेसिंग

प्रशासनाने येथे बरीच व्यवस्था केली आणि कॉन्टोमेंट झोन तयार करून कोरोनाला पसरण्यापासून रोखलं. संपूर्ण संक्रमित व्यक्तीचे ट्रेसिंग रॅपिड रिस्पॉन्स टीम (आरआरपी) च्या माध्यमातून केले. कोरोनाबाधित व्यक्ती कोठे आणि कोणास भेटला याची माहिती जमा केली. त्यानंतर हॉटस्पॉट्स आणि 38 अॅपीसेंटर चिन्हित करण्यात आले. जे नकाशावर दर्शवले गेले त्यापैकी 10 अॅपीसेंटर आता पूर्णपणे बंद झाली आहेत. यासह, 3 किमी अंतराचा झोन आणि 5-किमी बफर झोन बनविला गेला.

वाचा-'...तर लॉकडाऊन म्हणजे बुलेटशिवाय बंदुक', भारतीय डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता

1248 विशेष टीम तयार करण्यात आली

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रासाठी मायक्रोप्लान तयार करण्यात आले होते. 1248 विशेष पथके तयार केली गेली. ज्यामध्ये महानगरपालिका आणि आरोग्य विभागातील लोकांचा समावेश होता. या कार्यसंघांनी घरोघरी जाऊन सुमारे 9.3 लाख लोकांचे सर्वेक्षण केले. त्याने 1.65 लाख घरांचे स्क्रिनिंग करण्यात आले. यापैकी 2500 लोकांना कफ, सर्दी, ताप यासारख्या लक्षणे होती. तर, 36 लोकांचा प्रवासी इतिहास होता. प्रत्येकाची चौकशी करण्यात आली.

वाचा-'आम्हाला वाचवा नाहीतर...', पाकचे पंतप्रधान इमरान खान यांनी जगासमोर मागितली भीक

वॉर रुमद्वारे लोकांवर ठेवले जात आहे लक्ष

आग्रा स्मार्ट सिटी सेंटरचे रुपांतर वॉर रुममध्ये करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक खाजगी भागीदारीद्वारे संक्रमित व्यक्ती आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींसाठी 566 बेड क्वारंटाईन सेंटर तयार केले. याव्यतिरिक्त, 3060 संस्थात्मक अलग ठेवण्याचे केंद्र लोकांसाठी मोफत केंद्र केले गेले.

वाचा-खूशखबर! आता 90 दिवसांत कोरोनावर लस मिळणार, 'या' देशाने केला दावा

 या दोन मॉडेलची विशेष चर्चा

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देशात दोन मॉडेल्सची चर्चा आहे. एक आग्रा आणि दुसरे भिलवाडा. वस्तुतः आग्रामध्ये राबविल्या गेलेल्या यंत्रणेत संपूर्ण जिल्ह्यात केवळ हॉटस्पॉट्स चिन्हित करण्यात आली, मात्र सील करण्यात आले नाही. सीलबंद भागात डोर स्टेप डिलिव्हरीद्वारे आवश्यक वस्तू लोकांपर्यंत पोहोचविल्या गेल्या. अग्निशामक यंत्रांद्वारे निश्चित केलेल्या भागातील सर्व घरे स्वच्छ केली गेली. या प्रणालीमुळे लोक घाबरून गेले नाहीत आणि सर्व प्रकरणांची अल्पावधीतच ओळख झाली. या मॉडेलच्या यशानंतर उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने पहिल्या टप्प्यात राज्यातील इतर 15 जिल्ह्यांत याची अंमलबजावणी केली आहे. त्याच वेळी, भिलवाडा येथे राजस्थान सरकारने महाकर्फ्यू अंमलात आणून त्यावर नियंत्रण ठेवले गेले.

संकलन, संपादन-प्रियांका गावडे

First published: April 13, 2020, 12:08 PM IST

ताज्या बातम्या