Home /News /national /

शिवसेनेचं पुन्हा चलो अयोध्या, या दिवशी उद्धव ठाकरे घेणार रामललांचे दर्शन

शिवसेनेचं पुन्हा चलो अयोध्या, या दिवशी उद्धव ठाकरे घेणार रामललांचे दर्शन

लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जात थेट भाजपला आव्हान दिलं होतं. आता राम मंदिराचा प्रश्न निकाली लागल्यानंतर परिस्थिती बदलली आहे.

  मुंबई 22 फेब्रुवारी : शिवसेनेने पुन्हा एकदा चलो अयोध्येचा नारा दिलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्व खासदारांसह अयोध्येत जाऊन रामलल्लांच दर्शन करणार आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही घोषणा केलीय. उद्धव ठाकरे हे 7 मार्चला अयोध्येला जाणार आहेत. ते विशेष विमानाने अयोध्येत पोहोचतील. दुपारी श्रीरामाचं दर्शन आणि संध्याकाळी शरयू आरती करणार आहेत. हा सोहळा ऐतिहासिक असून सगळ्यांनी त्यात सहभागी व्हावे असं आवाहनही त्यांनी केलंय. सुप्रीम कोर्टाने अयोध्येचा निकाल दिल्यानंतर गेल्या अनेक दशकांचा हा प्रश्न मार्गी लागला होता. त्यानंतरही उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच अयोध्या भेट आहे. या आधी दोन वेळा त्यांनी अयोध्येत जाऊन रामललांचे दर्श घेत शरयूची आरतीही केली होती. राम मंदिराच्या बांधकामासाठी केंद्र सरकारने एका ट्रस्टची घोषणाही केली असून त्यावर सदस्यांची नियुक्तीही केली आहे. राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्ताने ते अयोध्येत जाणार असल्याची माहिती दिली जातेय.  लोकसभा निवडणुकीच्या आधीही ठाकरे हे अयोध्येला गेले होते. त्यावेळी त्यांनी घोषणा केली होती की मी पुन्हा अयोध्येला येईन. ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी ते अयोध्येत जावून रामललाचं दर्शन घेणार आहे. CAAवरून काँग्रेसने साधला CM उद्धव ठाकरेंवर निशाणा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून ही माहिती दिलीय. ते म्हणाले, सरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पुर्ण करणारच! प्रभू श्रीरामाची कृपा. सरकारला शंभर दिवस पुर्ण होताच मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे अयोध्येस जातील .श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील. 2 नोव्हेंबर 2018 रोजी उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा अयोध्येचा दौरा केला होता. त्यावेळी लोकसभा निवडणुकीची चर्चा जोरात होती. निवडणुकीदरम्यान शिवसेना – भाजपमध्ये राजकीय संबंध देखील ताणले गेले होते. पण, लोकसभा निवडणुकीमध्ये युती केल्यानंतर शिवसेना – भाजपला राज्यात मोठं यश मिळालं.

  शरद पवारांनी केलं CM उद्धव ठाकरेंचं तोंड भरून कौतुक, म्हणाले...

  लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जात थेट भाजपला आव्हान दिलं होतं. नंतर भाजप आणि शिवसेनेच दिलजमाई झाली आणि राजकीय परिस्थिती बदलली. त्यावेळी मी पुन्हा अयोध्येत येईल असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. विधानसभा निवडणुकीनंतर परिस्थिती बदलली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.
  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: Uddhav thackeray

  पुढील बातम्या