Home /News /national /

CM ठाकरेंची तोफ धडाडणार, विधान परिषदेसाठी सेनेचे दोन उमेदवार रिंगणात, मुंबईत कोरोनाचा भयंकर विस्फोट! TOP बातम्या

CM ठाकरेंची तोफ धडाडणार, विधान परिषदेसाठी सेनेचे दोन उमेदवार रिंगणात, मुंबईत कोरोनाचा भयंकर विस्फोट! TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

    मुंबई, 8 जून : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची औरंगाबादमध्ये 8 जून रोजी जाहीर सभा होणार आहे. माजी मंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांनी मतदानाकरता दिलेल्या अर्जावर आज कोर्ट निकाल देणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे (Shiv Sena) दोन उमेदवार निश्चित झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांना मोठा इशारा दिला आहे. राज्यात आज एकाच दिवसात 1881 रुग्ण आढळले आहेत. देशविदेशातील बातम्या काही मिनिटांत वाचा. उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची औरंगाबादमध्ये 8 जून रोजी जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी देखील झाली आहे. मात्र, त्याआधीच भाजपने पोस्टरबाजी करुन शिवसेनेला खिजवण्याचा प्रयत्न केला आहे. शहरात ज्या ठिकाणी मुख्यमंत्री ठाकरेंच्या सभेच्या मोठमोठे पोस्टर लागले आहे. त्याच परिसरात भाजपने पोस्टर लावून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. यावर मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देशमुख आणि मलिक यांच्या अर्जावर सुनावणी माजी मंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांनी मतदानाकरता दिलेल्या अर्जावर आज कोर्ट निकाल देणार आहे. शिवसेनेचे विधान परिषदेसाठी दोन उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे (Shiv Sena) दोन उमेदवार निश्चित झाले आहेत. शिवसेना नेते सचिन अहिर (Sachin Aher) आणि आमशा पाडवी (Amasha Padvi) यांना पक्षश्रेष्ठींकडून उमेदवारी देण्यात आली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. फुटण्याची भाषा करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा मोठा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांना मोठा इशारा दिला आहे. "अपक्ष आणि इतर लहान पक्षांची नाराजी आपण दूर करतोय. पण जे फुटण्याची भाषा करत आहेत त्यांनीही हे लक्षात ठेवावं. पुढील अडीच वर्ष आपलंच सरकार आहे. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातील कामं करण्यासाठी त्यांना आपल्याकडेच यायचं आहे", असं सूचक विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. मुख्यमंत्र्यांचा विजयोत्सव साजरा करण्याचा निर्धार राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election 2022) पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची मुंबईतील ट्रायडेंट (trident) या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) स्वत: उपस्थित होते. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेसचे दिग्गज नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) उपस्थित होते. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. मुंबईत कोरोनाचा भयंकर विस्फोट! राज्यात आज एकाच दिवसात 1881 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी सर्वाधिक 1242  रुग्ण मुंबईतील आहेत (Mumbai corona cases). धक्कादायक म्हणजे एकाच दिवसात मुंबईतील नव्या रुग्णांचा आकडा दुप्पट झाला आहे (Double corona patinet in Mumbai). सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. केतकीला पुन्हा झटका गेल्या काही दिवासांपासून सोशल मीडियावर केतकी चितळे (Ketaki Chitale Case) हे नाव चांगलच चर्चेत आलं आहे. शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणं तिला चांगलं महागात पडलं आहे. याप्रकरणी दिवसेंदिवस तिच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. तसेच आता नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार, ॲट्राॅसिटी प्रकरणात केतकी चितळेच्या जामीन अर्जावर सुनावणी 16 जूनला सुनावणी होणार आहे. सविस्तर वाचण्य्साठी क्लिक करा.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Corona, Uddhav tahckeray

    पुढील बातम्या