Home /News /national /

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे PM मोदींच्या निवासस्थानी दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे PM मोदींच्या निवासस्थानी दाखल

या बैठकीत राज्याशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

    नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भेटीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी दाखल झाले असून दोन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरू झाली असल्याची माहिती आहे. या बैठकीला कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे हेदेखील उपस्थित आहेत. राज्याशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्वच मुख्यमंत्री हे पंतप्रधानांची भेट घेत असतात. हा शिष्टाचार समजला जातो. या भेटीत मुख्यमंत्री हे आपल्या राज्याचे प्रश्नही पंतप्रधानांपुढे मांडतात. मात्र 25 वर्ष शिवसेना हा भाजपचा मित्रपक्ष होता आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने सरकार स्थापन केलंय. त्यामुळे या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा 5 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अधिकृत भेट. 7 वाजता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची सदिच्छा भेट. 8 वाजता भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची आशिर्वाद भेट. 9 वाजता केंद्रीय गृह मंत्री यांची अमित शहा यांची भेट. दरम्यान, ठाकरे सरकारला आता तीन महिने होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री दिल्लीत गेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना भेटणार असल्याचं म्हटलं होतं. काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध झुगारत उद्धव ठाकरे यांनी राज्यात CAA लागू करणार असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे या भेटीत काय चर्चा होते याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    पुढील बातम्या