Home /News /national /

नक्षल्यांना रोखण्यासाठी 1200 कोटींचा निधी द्यावा, उद्धव ठाकरेंची अमित शहांकडे मागणी

नक्षल्यांना रोखण्यासाठी 1200 कोटींचा निधी द्यावा, उद्धव ठाकरेंची अमित शहांकडे मागणी

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वेगळी बैठक झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

    नवी दिल्ली, 26 सप्टेंबर: केंद्रीय गृहमंत्री (Home Minister) अमित शहा (Amit Shah) यांनी वाढत्या नक्षलवादी कारवाईच्या (Important meeting in wake of rising Naxal action) संदर्भात दिल्लीत (Delhi) बैठक (Meeting)आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray) उपस्थित होते. या बैठकीनंतर केंद्रीय गृह मंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वेगळी बैठक झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. जवळपास 15 मिनिटं ही बैठक झाल्याची माहिती समोर येतेय. विज्ञान भवनातील एका वेगळ्या खोलीत बैठक झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी गृहमंत्र्यांकडे महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. नक्षलवादी भागात विकास करण्यासाठी आणि नक्षल्यांना रोखण्यासाठी 1200 कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत राज्यातील परिस्थिती, नक्षलग्रस्त भागातील परिस्थिती आणि नक्षलग्रस्त भागात कराव्या लागणाऱ्या सोयीसुविधा आणि त्यासाठी लागणारा खर्च याबाबत गृहमंत्र्यांना आकडेवारी सांगितली. हेही वाचा- भाजप आमदाराची Audio Clip व्हायरल, महिला अधिकाऱ्यास शिवीगाळ दुर्गम भागात नवीन पोलीस पोस्ट स्थापन करणं, नक्षलग्रस्त भागात अधिकाधिक मोबाईल टॉवर बसवणं, नवीन शाळा बांधण्यावर भर देणं आदींसाठी हा निधी लागणार आहे. त्याबाबतचे सादरीकरण मुख्यमंत्र्यांनी अमित शहांना सांगितलं. हेही वाचा- मुंबईतील शाळाही लवकरच चालू होणार; मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितला हा फॉर्म्युला सुरक्षा आणि पोलीस यंत्रणांना काम करताना अनेकदा नेटवर्कच्या समस्यांचा सामना करावा लागतो, त्यासाठी या भागांत जास्तीत जास्त मोबाईल टॉवर्स उभरण्याची गरज असल्याचं सांगितलं. या दोन गोष्टींमुळे या भागांत खूप उपलब्धता येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे हे देखील उपस्थित होते. तसंच या बैठकीला महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, तेलगणा मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, ओरिसा मुख्यमंत्री नवीन पटनायक, आंध्रचे उपमुख्यमंत्री, झारखंडचे मुख्यमंत्री बंगालचे मुख्य सचिव आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान उपस्थित होते.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Amit Shah, Uddhav Thackeray (Politician)

    पुढील बातम्या