कोरोना योद्ध्यांच्या देशभक्तीला मुख्यमंत्र्यांचा सलाम, डॉक्टरांचं कुटुंबापेक्षा कर्तव्याला प्राधान्य

कोरोना योद्ध्यांच्या देशभक्तीला मुख्यमंत्र्यांचा सलाम, डॉक्टरांचं कुटुंबापेक्षा कर्तव्याला प्राधान्य

तब्बल 5 दिवसांनी डॉ. घरी आले पण गेटजवळच बसून राहिले. तेथेच चहा प्यायला आणि कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी निघून गेले

  • Share this:

भोपाळ, 31 मार्च : देशभरात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) सर्वाधिक धोका हा त्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना असतो. गेल्या अनेक दिवसांपासून हे वैद्यकीय कर्मचारी जीवाची बाजी लावून कोरोनाग्रस्त (Covid - 19) रुग्णांवर उपचार करीत आहे. अनेकांना तर घरी जाताही येत नाही. मात्र कोणतीही तक्रार न करता ते आपले कर्तव्य बजावत आहे.

डॉक्टर हे कोरोनाग्रस्तांच्या सर्वाधिक जवळ असल्याने त्यांना फार काळजी घ्यावी लागते. शिवाय हा आजार त्यांच्यापासून त्यांच्या कुटुंबीयांना होऊ नये यासाठी जास्तच जपावे लागते. असंच एक प्रेरणादायी व आदर्शवत उदाहरण भोपाळमधील डॉक्टरांनी समोर ठेवलं आहे. यांच नाव आहे डॉ. सुधीर डेहरिया. ते भोपाळचे CMHO (Chief Medical Health Officer) आहेत. तब्बल पाच दिवसांनी ते सोमवारी आपल्या घरी आले. मात्र घरात गेले नाही. गेटजवळच बसले. तेथूनच आपली मुलं व पत्नीची विचारपूस केली. बाहेर बसूनच चहा घेतला आणि तेथूनच रुग्णालयात निघून गेले.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या डॉक्टरांचे कौतुक करीत ट्विट केलं आहे. डॉक्टर डेहरिया  आणि यांच्यासारख्या अनेक हजारो-लाखो कोरोना वॉरियर्संना माझा शत् शत् नमन. आम्हाला तुमच्यावर गर्व असल्याचे चौहानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

संबंधित - बायकोच्या औषधासाठी 70 वर्षांच्या चाचांनी जे केलं ते वाचून व्हाल हैराण!

कोरोना रुग्णांवर उपचार करताना या आजाराचा संसर्ग वाढू नये ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव पर्याय असल्याचे सांगितले जात आहे.

First published: March 31, 2020, 2:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading