युतीचं सरकार 5 वर्षे पूर्ण करणारच ; उद्धव ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेनंतर मु्ख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

युतीचं सरकार 5 वर्षे पूर्ण करणारच ; उद्धव ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेनंतर मु्ख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

राज्यातलं भाजप शिवसेना सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय. शिवसेनेच्या स्वबळाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

  • Share this:

23 जानेवारी : राज्यातलं भाजप शिवसेना सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय. शिवसेनेच्या स्वबळाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. सरकारला कसलाच धोका नाही. ही पाच वर्ष सरकार पूर्ण करेलच, शिवाय पुढची पाच वर्षही शिवसेनेसोबत भाजप सत्ता स्थापन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. शिवसेना यापूर्वीही असं बोललीय असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.

शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्याला मुख्यमंत्र्यांनी फारसं गांभीर्यानं घेतलं नसल्याचं दिसून येतंय.सेनेच्या मंगळवारी वरळी येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत स्वबळाची घोषणा करण्यात आली.स्वबळाचा ठराव शिवसेने नेते संजय राऊत यांनी मांडला आणि त्याला खासदार अनिल देसाई यांनी अनुमोदन केले.

शिवसेनेचे सध्या 19 खासदार असून 63 आमदार आहेत. 2019 च्या निवडणुकांमध्ये 25 खासदार आणि 150 पेक्षा अधिक आमदार निवडून आणण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला आणि सभागृहातील मोठ्या संख्यने उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनी हात उंचावून आपण सज्ज असल्याचे दाखवून दिले.

First published: January 23, 2018, 3:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading