मराठी बातम्या /बातम्या /देश /

धक्कादायक! विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून SIT तपासाचे आदेश

धक्कादायक! विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून SIT तपासाचे आदेश

याआधीही अशा प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत

याआधीही अशा प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत

याआधीही अशा प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत

  • Published by:  Meenal Gangurde
उज्जैन, 15 ऑक्टोबर : मध्‍यप्रदेशातील उज्जैन (Ujjain) भागात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. विषारी दारूमुळे (Poisonous Liquor) येथील 14 जणांचा मृत्यू झाल्याने भागात खळबळ उडाली आहे. सर्व मृतांच्या शरीरात विषारी घटक सापडल्याचे उज्जैनचे एसपींनी पुष्टी दिली आहे. या घटनेनंतर खारा भागातील पोलीस ठाण्याच्या प्रभारींसह 4 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. याशिवाय अवैध दारूविरोधात कारवाईत 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या प्रकरणाचं गांभीर्य पाहता गुरुवारी या प्रकरणाची एसआयटीला चौकशीचे आदेश दिले आहेत. चौहान म्हणाले की, केवळ उज्जेनचं नाही तर संपूर्ण राज्यात अशा स्वरुपातील प्रकरणांवर लक्ष ठेवलं जाईल. जेथे कोठेही विषारी दारू तयार केली जात असल्याचा संशय येईल, त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर दुसरीकडे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ यांनी या घटनेवरुन भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. हे ही वाचा-कोरोनाची माहिती देणारे व्हिडीओ पाहताय? YouTube ने घेतला महत्त्वाचा निर्णय पोलिसांनी सांगितले... उज्जेन जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रुपेश द्विवेदी यांनी सांगितले की, बुधवार ते गुरुवारपर्यंत उज्जेनच्या तीन ठाणे हद्दीत खाराकुआ, जीवजीगंज ठाणे आणि महाकाल ठाण्यात विषारी द्रव्य प्यायल्याने 14 जणांचा मृत्यू झाला. यापैकी अनेक भिकारी तर गरीब होते. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी भागात छापेमारी करण्यात आली, यामध्ये 10 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ज्यामध्ये मुख्यत: जिंजर तयार करणारे सिंकदर, गबरु आणि युनूस यांचा समावेश आहे. हे लोक बेकायदेशीरपणे जिंजर (विषारी दारू) तयार करीत विक्री करीत होते.
First published:

पुढील बातम्या