S M L

...तर काश्मीरमध्ये तिरंगा फडकवणारा कुणीही राहणार नाही -मेहबुबा मुफ्ती

जम्मू-काश्मीरमधील जनतेला मिळालेल्या विशेषाधिकारामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला अथवा....

Sachin Salve | Updated On: Jul 29, 2017 04:44 PM IST

...तर काश्मीरमध्ये तिरंगा फडकवणारा कुणीही राहणार नाही -मेहबुबा मुफ्ती

29 जुलै : जम्मू-काश्मीरमधील जनतेला मिळालेल्या विशेषाधिकारामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला अथवा राज्याच्या विशेष घटनात्मक दर्जाशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर काश्मीरमध्ये तिरंगा फडकवणारा कुणीही राहणार नाही, असा इशारा राज्याच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी दिला.

राज्याला मिळालेल्या विशेषाधिकावरील हल्ले योग्य नाहीत. याबाबत कोणत्याही प्रकारचा समझोता होऊ शकत नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

घटनेतील अनुच्छेद 35 अ रद्द करण्यासंबंधी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.या याचिकेवर सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मुफ्ती यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ३५ अ नुसार जम्मू-काश्मीरमधील आमदार आणि खासदारांना विशेष सवलती देण्यात येतात.

घटनेमध्ये जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देण्यात आले आहेत. काश्मीरप्रश्न सोडवण्याची आवश्यकता आहे. विशेषाधिकारांवर हल्ले करून या हा मुद्दा अधिक गुंतागुंतीचा करायचा नाही, असंही त्यांनी सुनावलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 29, 2017 04:44 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close