मराठी बातम्या /बातम्या /देश /

दिल्लीत पुन्हा Lockdown? मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक, होणार मोठा फैसला

दिल्लीत पुन्हा Lockdown? मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक, होणार मोठा फैसला

सर्वोच्च न्यायालयानं ताशेरे (CM Kejariwal calls urgent meeting on pollution issue) ओढल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर: सर्वोच्च न्यायालयानं ताशेरे (CM Kejariwal calls urgent meeting on pollution issue) ओढल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. दिल्लीतील वाढत्या प्रदुषणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली (Supreme court criticizes government over corruption) सरकारचे कान टोचले. प्रदुषणाची गंभीर पाहता सरकार काय हालचाल करतंय, असा सवाल कोर्टानं विचारला. त्यानंतर ही बैठक बोलावली असल्यामुळे त्यात काहीतरी मोठा (Big decision on pollution expected) निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

दिल्लीतील प्रदुषणाचा स्तर अति धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. एक्युआयची पातळी 500 च्या वर पोहोचली आहे. शनिवारी याच संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी आता नागरिकांना घरातदेखील मास्क लावून बसण्याची गरज असल्याचा टोला लगावत न्यायमूर्तींनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. त्यानंतर प्रदुषणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासठी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन, पर्यावऱण मंत्री गोपाल राय आणि दिल्लीचे मुख्य सचिव सहभागी होणार आहेत.

वाहनांवर येणार मर्यादा

प्रदुषणाच्या समस्येतून तोडगा काढण्यासाठी तातडीचा उपाय म्हणून वाहनांची संख्या कमी करण्यावर भर दिला जाऊ शकतो. त्यासाठी दिल्लीत दररोज रस्त्यावर येणारी 30 टक्के वाहनं कमी होतील, यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी सर्व कंपन्या आणि सरकारी कार्यालयांमधील उपस्थितीचे निकष बदलण्यात येतील, अशी चर्चा आहे.

हे वाचा- OMG! या अवलियानं जमवल्या 10 लाख सिगरेट; वाचा, फिटनेसची अनोखी कहाणी

वर्क फ्रॉम होम की लॉकडाऊन?

दिल्लीतील प्रदुषणावर तोडगा काढण्यासाठी शक्य त्या सर्व संस्थांमध्ये वर्क फ्रॉम होम सुरू करण्याचे आदेश निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी लॉकडाऊन लावण्यात येण्याची शक्यतादेखील विचाराधीन असल्याची माहिती आहे. प्रत्यक्षात काय उपाययोजना केल्या जातात, हे होणाऱ्या बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे.

First published:

Tags: Arvind kejriwal, Delhi, Lockdown