नवी दिल्ली, 13 डिसेंबर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमधली बैठक संपली आहे. दुष्काळा संदर्भात राज्य सरकार करत असलेल्या कामाची माहिती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिल्याचं कळतंय.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज संध्याकाळी साडेपाच वाजता पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या बैठकीत महाराष्ट्रातील दुष्काळाविषयी चर्चा झाली. दुष्काळासंदर्भात राज्य सरकार करत असलेल्या कामाची माहिती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिली.
तसंच केंद्र सरकारकडून लवकरात लवकर दुष्काळा संदर्भात मदत देण्याच्या मुख्यमंत्र्यांनी विनंती केल्याचं कळतंय. तसंच धारावीच्या पुनर्विकासाबद्दलही चर्चा मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली.
Had a very good meeting with Hon PM @narendramodi ji in New Delhi.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 13, 2018
Briefed him on drought situation and measures taken by Maharashtra Govt for mitigation & requested for speedy assistance from GoI to Maharashtra.
Also discussed on railway land issue for Dharavi redevelopment. pic.twitter.com/G2lWpiSBn1
दरम्यान, पाच राज्याच्या निवडणुकीत भाजपला तीन राज्यात सत्ता गमाववी लागली. राज्यात निवडणुका येऊन ठेपल्या आहे. त्यातच शिवसेनेनं स्वबळाचा नारा दिला आहे. तसंच राम मंदिरांच्या मुद्यावरूनही सेना आक्रमक आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी आघाडीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस नवीन काही निर्णय घेतील अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
========================