नोटबंदीनंतर २ लाख २४ हजार बोगस कंपन्या बंद

नोटबंदीनंतर २ लाख २४ हजार बोगस कंपन्या बंद

नोंदणीकृत कंपन्यांपैकी एक तृतीयांश कंपन्या बंद असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

  • Share this:

28 नोव्हेंबर : नोटबंदीनंतर बोगस आणि गैरव्यवहार करणाऱ्या कंपन्याविरोधात केंद्र सरकारने मोहीम उघडलीये. आतापर्यंत  2 लाख 24 हजार बोगस कंपन्यांना टाळ ठोकण्यात आलंय.  तसंच नोंदणीकृत कंपन्यांपैकी एक तृतीयांश कंपन्या बंद असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

नोटबंदीनंतर जवळपास 2.24 लाख कंपन्या "Shell" म्हणजे बोगस आणि गैरव्यवहार करणाऱ्या ठरवून बंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे. या कंपन्यांच्या जवळपास तीन लाख संचालकांना अपात्र ठरवण्यात आलंय. पण यापेक्षा आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे.

कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या ताज्या माहितीनुसार, देशातल्या नोंदणीकृत एकूण सुमारे 17 लाख पैकी ऑक्टोबर अखेर जवळपास 11.30 लाख कंपन्या या कार्यरत आहेत, इतर जवळपास 5.70 लाख कंपन्या कार्यरत नसल्याचे समोर आले आहे. याचा अर्थ या कंपन्यांची नोंद झाली मात्र त्या कंपन्यामार्फत उद्योग व्यापार अथवा व्यवहार झालेच नाहीत.

दरम्यान, नोटाबंदी नंतर बँकांमध्ये हजारो खाती उघडून हवाला मार्फत काळ्या पैशाचा व्यवहार करणारे अथवा काळा पैसा पंधरा करणाऱ्या कंपन्या समोर आल्या तसxच लाच किंवा टक्केवारी-कमिशन अशा गैरव्यवहाराचे पैसे अशा कंपन्यामार्फत घेतले जातात हेही स्पष्ट झालंय. त्यात ही नवी आकडेवारी समोर आल्याने चौकशीची कक्षा रुंदावली आहे.

आतापर्यंत बोगस कपन्यांच्या खात्यांबाबत 5 प्रमुख बँकांची आकडेवारी जाहीर झाली आहे. एकूण 30 बँकांची आकडेवारी जमा करण्याचे काम सुरू आहे. ही आकडेवारी समोर आल्यावर एकूण बोगस कपन्या आणि त्यांची बँक खाती याबाबत नेमकी स्थिती समजू शकेल.

2.24 लाख कंपन्या बंद

- नोटबंदीनंतर पैसे फिरवण्यासाठी बोगस कंपन्यांचा वापर ?

- कंपन्यांची बँक खाती वापरून काळा पैसा पांढरा केला ?

- अनधिकृत कमीशन किंवा लाच या कंपन्यांमार्फत घेतली जाते

- बोगस कंपन्यांच्या बँक खात्यांची चौकशी सुरू

- 5 प्रमुख बँकांकडून या खात्यांची आकडेवारी जाहीर

- एकूण 30 बँकांची आकडेवारी जमा करण्याचं काम सुरू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2017 09:05 AM IST

ताज्या बातम्या