• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • या कारणामुळे झाले 2 हजार मृत्यू, राज्यसभेत मंत्र्यांनीच दिली धक्कादायक माहिती

या कारणामुळे झाले 2 हजार मृत्यू, राज्यसभेत मंत्र्यांनीच दिली धक्कादायक माहिती

हवामानामध्ये झालेल्या अतिरेकी बदलांमुळे देशभरात 2 हजार मृत्यू ओढवले आहेत, अशी धक्कादायक माहिती राज्यसभेमध्ये देण्यात आली. केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी ही माहिती दिली आहे. पण या सगळ्याचा तापमानवाढ आणि हवामान बदलाशी काहीही संबंध नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 8 जुलै : हवामानामध्ये झालेल्या अतिरेकी बदलांमुळे देशभरात 2 हजार मृत्यू ओढवले आहेत, अशी धक्कादायक माहिती राज्यसभेमध्ये देण्यात आली. केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी ही माहिती दिली आहे. पण या सगळ्याचा तापमानवाढ आणि हवामान बदलाशी काहीही संबंध नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. 2018- 2019 या आर्थिक वर्षात 2 हजार 405 जणांचा जीव गेला आहे. चक्रीवादळं, पूर, दरड कोसळणं, ढगफुटी अशा घटनांमुळे हे बळी गेले आहेत, अशी गृहमंत्रालयाची माहिती आहे. या गोष्टींसाठी आता आधार कार्डाची सक्ती नाही तापमानवाढीमुळे अशा नैसर्गिक आपत्तींचं प्रमाण वाढत जाणार आहे, असं बाबुल सुप्रियो म्हणाले. 1980 ते 2010 हा काळ जर पाहिला तर या काळात 431 नैसर्गिक दुर्घटना घडल्या. यामध्ये मनुष्यहानी, वित्तहानी झाली. नैसर्गिक संपदेचंही नुकसान झालं. पण त्याचा हवामान बदलाशी थेट संबंध जोडता येणार नाही, असं बाबुल सु्प्रियो म्हणाले. पर्यावरणपूरक तंत्रज्ञान ज्या भागात नैसर्गिक आपत्तींचं प्रमाण जास्त आहे त्या भागांसाठी हवामान बदल निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  तसंच पर्यावरण पूरक तंत्रज्ञानाच्या विकासावरही भर देण्यात येईल. सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर, पाण्याचं संवर्धन, प्रदूषण रोखण्यासाठीचे उपाय यावरही भर देण्यात येणार आहे.

  पाकिस्तानमधल्या सर्वात 'वजनदार' माणसाचा मृत्यू

  चक्रीवादळं, पूर, उष्णतेची लाट अशा नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी कायकाय करायला हवं याबद्दल राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने काही मार्गदर्शक तत्त्वं तयार केली आहेत.राज्य सरकारांना याबद्दलच्या विशेष सूचना देण्यात येणार आहेत, अशी माहिती बाबुल सुप्रियो यांनी दिली. किनारपट्टीवरच्या राज्यांत खबरदारी देशभरातली 33 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी हवामान बदलाचा सामना करण्यासाठी काय उपाय काढावे यावर प्रस्ताव बनवला आहे. किनारपट्टीची राज्यं आणि पहाडी भागांमधल्या राज्यांनाही हवामान बदलाचा सामना करण्यासाठी विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. 2013 मध्ये आलेलं फयान, 2014 मधलं हुदहुद आणि 2018 मध्ये आलेलं तितली आणि नुकत्याच येऊन गेलेल्या फानी चक्रीवादळातही मनुष्यहानी सोसावी लागली होती. ================================================================================= VIRAL FACT : मुंबई पडला माशांचा पाऊस? हे आहे सत्य
  Published by:Arti Kulkarni
  First published: