OMG VIDEO : या गावाने मिळवलाय आशियातल्या सर्वात स्वच्छ गावाचा किताब

OMG VIDEO : या गावाने मिळवलाय आशियातल्या सर्वात स्वच्छ गावाचा किताब

मोदी सरकारने स्वच्छ भारत हा उपक्रम हाती घेतल्यानंतर देशभरातल्या गावागावांत, शहरांमध्ये स्वच्छतेबद्दल जागृती होते आहे पण भारतातच एक गाव असं आहे की स्वच्छता ही त्या गावाची अनेक पिढ्यांची परंपरा आहे.

  • Share this:

मुंबई, 26 जुलै : मोदी सरकारने स्वच्छ भारत हा उपक्रम हाती घेतल्यानंतर देशभरातल्या गावागावांत, शहरांमध्ये स्वच्छतेबद्दल जागृती होते आहे. स्वच्छतेचा ध्यास घेणं हे किती महत्त्वाचं आहे याबदद्ल पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणांमधून वारंवार सांगत असतात. पण भारतातच एक गाव असं आहे की स्वच्छता ही त्या गावाची परंपराच आहे.

हे आहे मेघालयातलं मावलिंगलाँग. या गावाला भारतातल्याच नाही तर आशियामधल्या सर्वात स्वच्छ गावाचा किताब मिळाला आहे. या गावात एक फेरफटका मारलात किंवा या स्वच्छ गावाचा हा व्हिडिओ पाहिलात तरी तुम्हाला खूप फ्रेश वाटेल.

या गावचे सरपंच थोमलिन सांगतात, आमच्या गावात पिढ्यान् पिढ्या हा स्वच्छतेचा वारसा जपला गेला आहे. गावातल्या बच्चेकंपनीपासून ते अगदी वृद्ध माणसांपर्यंत सगळेच जण या स्वच्छतेच्या कामात सहभागी होतात.

या गावात कोपऱ्याकोपऱ्यावर तुम्हाला बांबूच्या कचऱ्यापेट्या दिसतील. गावात सौरऊर्जेवर चालणारे दिवेही आहेत. स्वच्छता आणि पर्यावरण रक्षण हाच या गावाचा वसा आहे. आणि म्हणूनच 2003 मध्ये डिस्कव्हर इंडिया या मासिकाने मावलिंगलाँगला आशियातलं सर्वात स्वच्छ गाव म्हणून गौरवलं.

कचऱ्यावर लावला जातो दंड

यानंतर जगभरातले पर्यटक मेघालयातल्या या गावाला भेट द्यायला आवर्जून येऊ लागले. या पर्यटकांचं इथे स्वागत तर छान होतं पण पर्यटकांनी केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हे गाव त्यांच्याकडून स्वच्छता देणगी वसूल करतं!

गावातलेच एक स्वच्छता कार्यकर्ते हेन्री रोज आपल्या टीमसोबत गावातल्या रस्त्यांची पाहणी करतात. रस्त्यावर थोडासा जरी कचरा आढळला तरी त्यांना ते खपत नाही. म्हणून तर इथे येणारे पर्यटक म्हणतात, या गावात तर युरोपमधल्या काही गावांपेक्षाही जास्त आणि स्वच्छता आहे.इथे कुणालाही घर बांधण्याची परवानगी मिळवायची असेल तर पहिलं शौचालय बांधावं लागतं. त्याचबरोबर सांडपाण्याची नीट व्यवस्था नसेल तर ग्रामपंचायत लगेच नोटीस पाठवते.

'तर डोकं उडवा'

गावचे सरपंच थोमलिन म्हणतात, तुम्ही मावलिंगलाँगमध्ये कुठेही जा, तु्म्हाला थोडी जरी अस्वच्छता आढळली तर माझं डोकं उडवा !

हे सरपंच इतक्या आत्मविश्वासाने हे सांगू शकतात कारण त्यांना गावकऱ्यांवर विश्वास आहे. मावलिंगलाँगला मिळालेला आशियातल्या स्वच्छ गावाचा किताब त्यांना तेवढ्याच उजळ माथ्याने मिरवायचा आहे.

मेघालय हे ईशान्य भारतातलं एक सुंदर राज्य आहे आणि या स्वच्छ गावामुळे या राज्याची कीर्ती जगभरात पोहोचली आहे.

=====================================================================================================

पाण्यात नको ते धाडस करू नका, दुचाकीस्वार वाहून गेल्याचा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 26, 2019 08:48 PM IST

ताज्या बातम्या