चिमूटभर मीठ आणि कपड्याच्या तुकड्याने उजळून निघेल अख्खं गाव, IIT च्या प्राध्यापकाचा शोध

IIT खगरपूरच्या एका प्राध्यापकाने स्वच्छ ऊर्जानिर्मितीच्या उद्देशाने चांगलं संशोधन केलं आहे. चिमूटभर मीठ आणि कपड्याच्या एका तुकड्यातून ही ऊर्जानिर्मिती केली जाईल.

News18 Lokmat | Updated On: Oct 29, 2019 10:03 PM IST

चिमूटभर मीठ आणि कपड्याच्या तुकड्याने उजळून निघेल अख्खं गाव, IIT च्या प्राध्यापकाचा शोध

सुजित नाथ

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : IIT खगरपूरच्या एका प्राध्यापकाने स्वच्छ ऊर्जानिर्मितीच्या उद्देशाने चांगलं संशोधन केलं आहे. यामुळे स्वच्छ ऊर्जा तर मिळतेच पण ते कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. चिमूटभर मीठ आणि कपड्याच्या एका तुकड्यातून ही ऊर्जानिर्मिती केली जाईल. सौरऊर्जेच्या तुलनेत ही ऊर्जा स्वस्त आहे.

IIT खरगपूरच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉ. सुमन चक्रवर्ती सांगतात, कपड्यांमधून ऊर्जानिर्मिती होईल याचा विचार कुणी केला तरी होता का? पण हे शक्य आहे.

डॉ. सुमन चक्रवर्तींच्या मते, थोडंसं मीठ आणि कपड्याचा एका तुकडा यामुळे काही मिलिवॅट्स वीजनिर्मिती होऊ शकते.जर मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे ऊर्जानिर्मिती केली तर ती आणखी प्रभावी ठरू शकते.

स्वस्त ऊर्जानिर्मिती

Loading...

या डिव्हाइसची खासियत म्हणजे कपड्याच्या पृष्ठभागावरच्या ऊर्जेचा उपयोग करून विद्युतनिर्मिती करता येते. ग्रामीण भागात कमीत कमी साधनं वापरून आणि स्वस्तात ऊर्जानिर्मितीचा हा चांगला पर्याय आहे.

IIT हा प्रकल्प पश्चिम बंगाल सरकारला देणार आहे. या माध्यमातून ग्रामीण भागात वीजपुरवठा करता येईल.

(हेही वाचा : भारतीय कंपनीने लाँच केलं जगातलं सर्वात महागडं चॉकलेट, किंमत ऐकून व्हाल थक्क)

===========================================================================================

शरद पवारांच्या दणक्याने उदयनराजे हादरले, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2019 06:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...