राजन आणि साजन मिश्रा यांची जोडी होती प्रसिद्ध राजन आणि साजन मिश्रा दोघे भाऊ होते आणि सोबतच कलेचं प्रदर्शन करीत होते. पंडित राजन आणि साजन मिश्रा यांचं माननं होतं की, मनुष्याचं शरीर पाच तत्वांनी तयार झालेलं आहे. तसंच संगीताचे सात सूर ‘सारेगामापाधानी’ पशू-पक्ष्यांच्या आवाजातून तयार झाले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजन - साजन मिश्र या प्रसिद्ध जोडीतील ज्येष्ठ शास्त्रीय गायक पद्मभूषण पंडित राजन मिश्र यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. पंडित राजन मिश्र यांनी आपल्या व्यापक आणि वैविध्यपूर्ण योगदानामुळे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत समृद्ध केले. त्यांच्या निधनामुळे देश एका महान शास्त्रीय गायक, संशोधक व गुरुला मुकला आहे. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबीयांना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.शास्त्रीय गायन की दुनिया में अपनी अमिट छाप छोड़ने वाले पंडित राजन मिश्र जी के निधन से अत्यंत दुख पहुंचा है। बनारस घराने से जुड़े मिश्र जी का जाना कला और संगीत जगत के लिए एक अपूरणीय क्षति है। शोक की इस घड़ी में मेरी संवेदनाएं उनके परिजनों और प्रशंसकों के साथ हैं। ओम शांति!
— Narendra Modi (@narendramodi) April 25, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona updates, Covid-19 positive