मराठी बातम्या /बातम्या /देश /

"Sorry बाबा मला माफ करा" म्हणत मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न, मन सुन्न करणारी Suicide note आली समोर

"Sorry बाबा मला माफ करा" म्हणत मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न, मन सुन्न करणारी Suicide note आली समोर

"Sorry बाबा मला माफ करा" म्हणत मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न, Suicide note मधून धक्कादायक माहिती समोर

"Sorry बाबा मला माफ करा" म्हणत मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न, Suicide note मधून धक्कादायक माहिती समोर

Class 11 girl attempts suicide: 11वीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेपूर्वी तिने लिहिलेली सुसाईड नोट समोर आली असून त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • Published by:  Sunil Desale

जबलपूर, 10 डिसेंबर : 'सॉरी पप्पा...' म्हणत एका 11वीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न (class 11 girl attempts suicide) केला आहे. स्वत:वर पेट्रोल ओतून तिने पेटवून दिले. या घटनेत ही मुलगी होरपळली असून तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हे टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी तिने एक चिठ्ठी लिहिली होती. या चिठ्ठीतून धक्कादायक माहिती समोर (Shocking information reveals from Suicide note) आली आहे. पीडित मुलगी अल्पवयीन आहे.

ही घटना मध्यप्रदेशातील जबलपूर येथील आहे. जबलपूर येथील 11वीत शिकणाऱ्या मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तिच्यावर मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तिने लिहिलेल्या सुसाईडनोटमध्ये आरोपींची नावे लिहिली आहेत. इतकेच नाही तर आपण पोलिसांत सुद्धा तक्रार केली होती मात्र, पोलिससांनी याकडे दुर्लक्ष केल्याचं म्हटलं आहे.

तहसील कार्यालयासमोर तरुणाची आत्महत्या, Suicide note आली समोर

काय लिहिलं आहे सुसाईड नोटमध्ये ?

पीडित मुलीन आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली आहे. छेडछाडीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हणत आरोपी तरुणांची नावे तिले चिठ्ठीत लिहिली आहेत. त्यात म्हटलं आहे, "मी आत्महत्या करत आहे आणि माझ्या आत्महत्येसाठी ही लोक जबाबदार आहेत. या सर्वांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. मला घरातून बाहेर पडणं कठीण झाले. ही मुलं माझ्या घराच्या आसपास फिरत असतात. मी पोलीस स्टेशनला याबाबत तक्रारही दिली होती. मात्र काहीही कारवाई झाली नाही. माझ्यामुळे माझ्या बहिणींचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून मी आत्महत्या करत आहे. सॉरी पप्पा .... मला माफ करा."

पोलिसांवर प्रश्नचिन्ह

स्वत:ला पेटवून घेतल्याने पीडित मुलगी गंभीररित्या जखमी झाली आहे. पीडित मुलीला कुटुंबीयांनी तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती चिंताजनक आहे. सुसाईड नोटमध्ये पीडित मुलीने पोलिसांत तक्रार कुरनही काहीही कारवई झाली नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

'XXX आणि XXXने माझा बलात्कार केला आणि....' Suicide नोट लिहून तरुणीची आत्महत्या

आरोपींना अटक

या प्रकरणी आता पोलिसांनी कारवाई केली आहे. सुसाईड नोटमध्ये ज्या मुलांची नावे पीडित तरुणीने लिहीली आहेत त्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

बुलढाण्यातही घडला होता असाच प्रकार

बुलढाण्यात (Buldhana) 20 सप्टेंबर रोजी एका तरुणीने आत्महत्या (girl suicide) केली होती. या प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी पीडित मुलीने लिहिलेली सुसाईड नोट (Suicide note) समोर आली असून ती वाचून पोलीसही हादरले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यात एका 18 वर्षीय युवतीने 20 सप्टेंबरला आत्महत्या केली होती. या युवतीने नेमके कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा खुलासा झाला नव्हता. मात्र नंतर या युतीच्या आत्महत्येचे कारण उलगडले आहे. घरातील भगवद्गगीतेमध्ये या युवतीने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठीत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या दोन जणांची नावं तिने लिहून ठेवली होती.

काय म्हटलं होतं चिठ्ठीत?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीने चिठ्ठीत आरोपींची नावे लिहिली होती. "XXX आणि XXX यांनी माझ्यावर बलात्कार केला आहे. ही घटना सांगू शकत नसल्याने मी आत्महत्या करत आहे असं सुसाईड नोटमध्ये म्हटलं होतं.

First published:

Tags: Crime, Madhya pradesh, Suicide