पश्चिम बंगालमध्ये मतदानापूर्वी हिंसाचार, दंगलखोरांनी गाड्या पेटवल्या

पश्चिम बंगालमध्ये मतदानापूर्वी हिंसाचार, दंगलखोरांनी गाड्या पेटवल्या

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. मात्र, मतदानाच्या पूर्वसंध्येला पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंसा भडकली.

  • Share this:

मुंबई, 19 मे- लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. मात्र, मतदानाच्या पूर्वसंध्येला पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंसा भडकली. राज्याच्या 24 परगना जिल्ह्याच्या भाटपाड्यात शनिवार रात्री उशीरा जमावाने अनेक गाड्यांची तोडफोड केली. या दरम्यान जमावाने दोन गाड्यांवर बॉम फेकले. नंतर एकच गोंधळ उडाला. दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या आहेत. दंगलखोरांनी अनेक भागात जाळपोळ आणि दगडफेक केली. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलिस कूमक तैनात करण्यात आली आहे. पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सातव्या अर्थातच अखेरच्या टप्प्यात आज रविवारी मतदानाला सुरुवात झाली आहे. शेवटच्या टप्प्यात 59 जागांसाठी मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातही मतदान होणार आहे. पंजाब आणि उत्तर प्रदेश (प्रत्येकी 13), पश्चिम बंगाल (9), बिहार आणि मध्य प्रदेश (प्रत्येकी 8), हिमाचल प्रदेश (4), झारखंड (तीन) आणि चंडीगडमधील एका जागेसाठी रविवारी मतदान होणार आहे. पणजी (गोवा) येथे एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

SPECIAL REPORT : देवा तुझ्या दारी आलो, मोदींना पावणार का भोलेनाथ?

First published: May 19, 2019, 7:41 AM IST
Tags:

ताज्या बातम्या