श्रीनगर, 24 फेब्रुवारी : अनंतनाग जिल्ह्यातील सिरहामा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. यात चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे. सिरहामा भागात सुरक्षा दलाला दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर परिसरात सुरक्षा दलाने घेराव घालत शोधमोहीम सुरू केली.
Encounter has started at Shalgul forest area of Srigufwara, Anantnag. Police and Army are on the job: Kashmir Zone Police
— ANI (@ANI) February 24, 2021
J&K | 2-3 terrorists believed to be trapped at the site of ongoing encounter in Anantnag: CRPF sources
— ANI (@ANI) February 24, 2021
Four unidentified terrorists killed in an ongoing encounter in Anantnag: Jammu and Kashmir Police
— ANI (@ANI) February 24, 2021
दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील शालगुल जंगलात दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू झाली. पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने शालगुल जंगलात शोधमोहीम सुरू केली. काही वेळात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. दोन्ही बाजून गोळीबार सुरू झाला. यात 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितलं. परंतु त्यांनी गोळीबार सुरुच ठेवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्यापही दोन-तीन दहशतवादी लपले असल्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूने गोळीबार सुरूच आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian army, Jammu and kashmir, Police Encounter, Terrorism, Terrorist