पश्चिम बंगालमध्ये कार्यकर्त्यांनी एकमेकांवर फेकले बॉम्ब, दोघांचा मृत्यू

पश्चिम बंगालमध्ये कार्यकर्त्यांनी एकमेकांवर फेकले बॉम्ब, दोघांचा मृत्यू

खबरदारीचा उपाय म्हणून भाटापारा आणि जगदाल या गावामध्ये 144 कलम लागू केलं असून अतिरिक्त पोलीस दल तैनात केलं गेलंय.

  • Share this:

कोलकाता, 20 जून :  पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणूलच्या कार्यकर्त्यांमधला हिंसाचार थांबण्याचं काही नाव घेत नाहीये. आज पुन्हा उसळलेल्या हिंसाचारात उत्तर 24 परगना जिल्ह्यातल्या भाटपाडा इथे हिंसाचार उसळला. यात दोन जणांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. भाजप आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर बॉम्ब फेकले आणि गोळीबार गेला. यामुळे वातावरण तापलं आणि दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. जखमी असलेल्यामध्ये एकाची प्रकृती गंभीर आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून भाटापारा आणि जगदाल या गावामध्ये 144 कलम लागू केलं असून अतिरिक्त पोलीस दल तैनात केलं गेलंय. गेल्या दोन वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये तृणमूल आणि भाजपमध्ये राजकीय हिंसाचार सुरू आहे.

मोहन भागवतांची टीका

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचा समारोप रविवारी सायंकाळी नागपूरात झाला. संघाच्या सर्व कार्यक्रमांमध्ये तृतीय संघ शिक्षा वर्गाला सर्वात जास्त महत्त्व आहे. त्यामुळे या कार्यक्रमात सरसंघचालक काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मोदी सरकारचं कौतुक केलं आणि सल्लाही दिला. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर टीकास्त्र सोडलं. सत्तेचा माज केला की काय होतं हे बंगालच्या जनतेने दाखवून दिलं असं सांगत त्यांनी राजकीय पक्षांना इशाराही दिला. पश्चिम बंगाल मध्ये काय सुरु आहे असे कुठे झाले आहे काय? अशा परिस्थितीत शासन प्रशासनाने कारवाई करावी केली पाहिजे असंही ते म्हणाले.

विधानसभेची तयारी

लोकसभा निवडणुकीत 42 पैकी 18 जागा जिंकल्यानंतर आता भाजपनं 2021मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सध्या केवळ सहा आमदार आहेत. पण, हाच आकडा 250 करण्यावर भाजपनं लक्ष केंद्रीत केलं आहे. पश्चिम बंगालची विधानसभा सदस्य संख्या ही 294 आहे. यावर बोलताना पश्चिम बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी लोकसभेसाठी आम्ही 22 आकडा डोळ्यासमोर ठेवला होता. पण, आम्हाला 18 जागा जिंकता आल्या. विधानसभेसाठी आम्ही 250 हे लक्ष्य निश्चित केल्याचं कैलास विजयवर्गीय यांनी म्हटलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या 2 वर्षे आधीच राजकीय डावपेचांना सुरूवात झाल्याचं पाहायाला मिळत आहे.

प. बंगालमध्ये भाजपची ताकद आहे?

2014ची तुलना करता पश्चिम बंगालमध्ये भाजपची ताकद खूपच कमी होती. पण, भाजपनं त्यावर लक्ष केंद्रीत करत 2019च्या लोकसभा निवडणुकीत 18 खासदारांना विजयी करणयाची किमया साधली. त्यासाठी पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी देखील मेहनत घेतली. 2014मध्ये 34 जागा जिंकणारी तृणमुल काँग्रेस 2019मध्ये 22 जागा जिंकू शकली. तर, भाजपनं 18 जागा जिंकल्या. सध्या पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण जबरदस्त तापलेलं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला 40.5 टक्के मतं मिळाली आहेत.

First published: June 20, 2019, 5:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading