सरन्यायाधीशांनी PM मोदींना लिहिली दोन पत्रं; हे आहे कारण... Ranjan Gogoi | Narendra Modi | Supreme Court

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन पत्र लिहली आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 22, 2019 12:01 PM IST

सरन्यायाधीशांनी PM मोदींना लिहिली दोन पत्रं; हे आहे कारण... Ranjan Gogoi | Narendra Modi | Supreme Court

नवी दिल्ली, 22 जून: सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन पत्र लिहिली आहेत. यातील पहिले पत्र सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठांमध्ये न्यायाधीशांची संख्या वाढवण्यासंदर्भातील आहे. तर दुसऱ्या पत्रात उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींचे निवृत्तीचे वय 62 वरून 65 करण्याची सूचना केली आहे. सरन्यायाधीशांनी अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या खटल्यांचा दाखला दिला आहे. हे खटले लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी न्यायाधीशांची संख्या वाढवणे गरजेचे असल्याचे न्या.गोगोई यांनी म्हटले आहे.

सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशांची पुन्हा नियुक्त करण्याची तरतूद करण्याची महत्त्वाची सूचना न्या.गोगोई यांनी केली आहे. यामुळे खटले लवकरात लवकर निकाली काढण्यास मदत होईल. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 32 आहे. पण प्रत्यक्षात यातील अनेक जागा रिक्त आहेत. 1998मध्ये न्यायाधीशांची संख्या 18 वरून 26 करण्यात आली होती. त्यानंतर 2009मध्ये ही संख्या 31 इतकी करण्यात आली होती. आता प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता न्यायाधीशांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. न्या.गोगोई यांनी पत्रात प्रलंबित खटल्यांची संख्या 2007मध्ये 47 हजार 078 इतकी होती ती आता 58 हजार 669 वर पोहोचली असल्याचे म्हटले आहे.

सरकारी आकडेवारीनुसार उच्च न्यायालयात 44 लाख तर सर्वोच्च न्यायालयात 58 हजार खटले प्रलंबित आहेत. रोज मोठ्या संख्येने नवे खटले दाखल होत असल्यामुळे प्रलंबित खटल्यांची संख्या वाढत चालली आहे. न्या.गोगोई यांनी पत्रात असा देखील उल्लेख केला आहे की, सर्वोच्च न्यायालयात असे 26 खटले आहेत जे गेल्या 25 वर्षांपासून प्रलंबित आहेत. 100 खटले असे आहेत जे 20 वर्षाासून, 593 खटले 10 वर्षापासून तर 4 हजार 977 खटले असे आहेत जे गेल्या 10 वर्षापासून प्रलंबित आहेत.

न्या.गोगोई यांच्या या पत्रावर मोदी सरकार काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सिडकोच्या 90 हजार घरांच्या लॉटरीचा मुहूर्त ठरला, इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 22, 2019 11:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...