मराठी बातम्या /बातम्या /देश /

सरन्यायाधीश N V Ramana यांच्या नावे सुरू असलेलं बनावट Twitter Account अखेर बंद

सरन्यायाधीश N V Ramana यांच्या नावे सुरू असलेलं बनावट Twitter Account अखेर बंद

न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा कोणत्याही सोशल मीडियावर नाहीत. तरीही त्यांच्या नावानं एक बनावट अकाउंट ट्विटरवर कार्यरत असल्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीला आढळलं होतं.

न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा कोणत्याही सोशल मीडियावर नाहीत. तरीही त्यांच्या नावानं एक बनावट अकाउंट ट्विटरवर कार्यरत असल्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीला आढळलं होतं.

न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा कोणत्याही सोशल मीडियावर नाहीत. तरीही त्यांच्या नावानं एक बनावट अकाउंट ट्विटरवर कार्यरत असल्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीला आढळलं होतं.

    नवी दिल्ली, 27 एप्रिल: ट्विटर इंडियानं सोमवारी सर्वोच्च न्यायालया (Supreme Court)च्या रजिस्ट्रीच्या तक्रारीवरुन कारवाई करत भारताचे 48 वे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या नावाने सुरू असलेलं बनावट ट्विटर अकाउंट बंद (Fake Twitter account suspended) केलं. दोनच दिवसांपूर्वी देशाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान झालेले न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा (N V Ramana) कोणत्याही सोशल मीडियावर नाहीत. तरीही त्यांच्या नावानं एक बनावट अकाउंट ट्विटरवर कार्यरत असल्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीला आढळलं होतं. त्यामुळं ट्विटरकडं तक्रार दाखल करण्यात आली होती. @NVRamanma नावानं आणि प्रोफाइलमध्ये सीजेआय अर्थात चीफ जस्टिस ऑफ इंडिया (Chief Justice of India) अशी नोंद असलेलं एक बनावट ट्विटर हँडल असल्याचं रजिस्ट्रीच्या निदर्शनास आलं होतं. रजिस्ट्रीनं तत्काळ याविरुद्ध ट्विटरकडं तक्रार केली. ट्विटर इंडियानंही तातडीनं या तक्रारीची दखल घेत कारवाई केली आणि हे बनावट अकाउंट बंद केलं, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिली. दरम्यान, सरन्यायाधीश एन. व्ही. रामणा कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नसतानाही त्यांच्या नावानं असे बनावट अकाउंट चालवलं जात असणं ही अत्यंत गंभीर बाब असल्यानं सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीनं दिल्ली पोलिसांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यास सांगितलं आहे. वाचा: न्यायमूर्ती NV Ramana देशाचे नवे सरन्यायाधीश, राष्ट्रपतींनी दिली शपथ आंध्रप्रदेशातील (Andhra Pradesh) कृष्णा जिल्ह्यात पोन्नवरम या खेड्यात एका शेतकरी कुटुंबात 27 ऑगस्ट 1957 रोजी जन्मलेल्या एन. व्ही. रमणा यांना शनिवारी, 24 एप्रिल रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारताचे 48 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ दिली. भारतीय न्यायव्यवस्थेतील हे सर्वोच्च पद असून याआधी न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी हे पद भूषवले होते. ते 23 एप्रिल 2021 रोजी निवृत्त झाले. त्यांनी गेल्या महिन्यात त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती रमणा यांच्या नावाची शिफारस केली होती. न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा ते 26 ऑगस्ट 2022 पर्यंत सरन्यायाधीश पदाची जबाबदारी सांभाळतील. एक वर्ष चार महिन्यांचा हा कालावधी आहे. आंध्र प्रदेशातील ते दुसरे सरन्यायाधीश आहेत. या आधी 1966-67 मध्ये न्यायमूर्ती के. सुब्बा राव हे भारताचे नववे सरन्यायाधीश होते. न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा यांची आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून 27 जून 2000 मध्ये नेमणूक झाली होती. 10 मार्च 2013 ते 20 मे 2013 पर्यंत त्यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिलं. 2013मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून आणि 2014मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक झाली. अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा यांचा सिंहाचा वाटा आहे.
    First published:

    Tags: Supreme court, Twitter, Twitter account

    पुढील बातम्या