पणजी, 5 डिसेंबर : गेल्या काही महिन्यांपासून मूनलाइटिंग हा शब्द खूप चर्चेत आला होता. आता तर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी देखील कधीकाळी मूनलाइटिंग केल्याचं समोर आलं आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी सांगितले की, सुरुवातीच्या काळात ते ऑल इंडिया रेडिओवर मूनलाइट करायचे. यात अनेक कार्यक्रमांचे अँकरींग आणि होस्टींग केलं आहे. अयोध्या आणि सबरीमालासारख्या मोठ्या निर्णयांमध्ये डीवाय चंद्रचूड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले असून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात कनिष्ठ वकील म्हणून प्रॅक्टिस सुरू केली होती.
गोव्यातील बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या पुढाकाराने आयोजित इंडिया इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लीगल एज्युकेशन अँड रिसर्चच्या पहिल्या शैक्षणिक सत्राचे उद्घाटन केल्यानंतर डीवाय चंद्रचूड बोलत होते.
वाचा - लावणी कलाकार झाली थेट PSI; वाचा, सुरेखा कोरडेंच्या ध्येयवेड्या प्रवासाची...
डीवाय चंद्रचूड यांनी 2000 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश आणि नंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम केले आहे. कायद्यासोबतच त्यांना संगीताची विशेष आवड आहे. एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले की मी 'मूनलाइटिंग' केले आहे आणि ऑल इंडिया रेडिओवर कार्यक्रम आयोजित करत असे. CJI चंद्रचूड यांनी एक मोठा खुलासा केला आहे की त्यांनी 'प्ले इट कूल', डेट विथ यू' आणि 'संडे रिक्वेस्ट' सारखे कार्यक्रम होस्ट केले आहेत. कार्यक्रमात ते म्हणाले की, मी 'मूनलाइटिंग' केल्याचे अनेकांना माहीत नाही. खरे तर एक काम करताना इतर काम एकाच वेळी करणे याला मूनलाइटिंग म्हणतात. इतर कामांची सार्वजनिक माहिती फार कमी लोकांना असते.
मी कोर्टातील वकिलांचे संगीत निवडतो आणि मग घरी जाऊन संगीत ऐकतो.
ते गमतीने म्हणाले की, जेव्हा मी कोर्टात वकिलांचे गाणं ऐकतो, तेव्हा घरी जाऊन संगीत ऐकतो आणि संगीत माझ्या दैनंदिन कामात समाविष्ट आहे. आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना नेहमी जिज्ञासू राहण्यास सांगितले. ते म्हणाले, 'स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न करा. स्वतःला जाणून घेण्याचा शोध हा सततचा शोध आहे. तुम्ही तो शोध लवकर सुरू करावा. आपला आत्मा आणि मन समजून घेण्यासाठी अधिक चांगले शोधा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Supreme court