High- Alert; जम्मू, श्रीनगरसह भारतातील नऊ एअरपोर्ट प्रवाशी विमानांसाठी पूर्ण बंद

इंडिगो, गो एअर कंपनीच्या विमानांना पुन्हा दिल्ला विमानतळावर पाठवण्यात आले आहेत. तसेच लेह, जम्मू, श्रीनगर आणि पठाणकोट विमानतळांना सतर्कतचा इशारा देण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 27, 2019 02:55 PM IST

High- Alert;  जम्मू, श्रीनगरसह भारतातील नऊ एअरपोर्ट प्रवाशी विमानांसाठी पूर्ण बंद

नवी दिल्ली, २७ फेब्रुवारी २०१९- पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या १३ व्या दिवशी भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ नेस्तनाबूत केले. यात सुमारे ३०० हून अधिक दहशतवादी ठार झाले. भारताने हल्ला केल्यानंतर या हल्ल्याचं योग्य उत्तर देऊ असं पाकिस्तानचं म्हणणं आहे. यानंतर उत्तर भारतातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना हाय- अलर्ट देण्यात आले. तसेच काश्मीर आणि श्रीनगरचे विमानतळ प्रवाशी विमानांसाठी काही काळासाठी पूर्ण बंद ठेवण्यात आली आहेत. जम्मू, श्रीनगर, लेहकडे जाणाऱ्या प्रवाशी विमानांना मूळ शहरांकडे परत पाठवण्यात आले आहे.

इंडिगो, गो एअर कंपनीच्या विमानांना पुन्हा दिल्ला विमानतळावर पाठवण्यात आले आहेत. तसेच अमृतसर, चंदिगड, लेह, जम्मू, श्रीनगर, देहरादून, धर्मशाला, सिमला, कांग्रा, कुल्लू मनाली, पितोरागढ आणि पठाणकोट विमानतळांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अनेक व्यावसायिक कंपन्यांच्या विमानांना उड्डाण भरण्यास मनाई करण्यात आली आहे.

भारतीय हवाई दलाचं एक विमान जम्मू काश्मीरमधील बडगाम इथं कोसळलं आहे. तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत अद्याप सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही.

दरम्यान, भारताच्या हवाई हल्ल्यानंतरही पाकच्या कुरापती सुरूच आहेत. जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी भारताने पाकच्या 5 चौक्या उद्ध्वस्त केल्या तसंच पाकिस्तानचे काही सैनिकही मारले गेल्याची माहिती आहे.

भारताने दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. त्यानंतर भारतानेही चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे सध्या जम्मू-काश्मीरमधील वातावरण अजूनही धुमसत असल्याचं चित्र आहे.

Loading...

दरम्यान, पुलवामा इथं दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर केलेल्या हल्लाचा भारताने हवाई हल्ला करून बदला घेतला आहे. भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं आहे. यावेळी भारतीय हवाई दलानं दहशतवादी तळावर 1000 किलोंचे बॉम्ब फेकले होते. यात दहशतवाद्यांचं मोठं नुकसान झालं होतं. भारताच्या या कारवाईत ३०० दहशतवाद्यांचा खात्मा झाला. मिराज विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून ही कारवाई केली.

भारतीय हवाई दलाचं विमान कोसळलं, घटनास्थळावरील EXCLUSIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2019 11:51 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...